सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, 'हे' आहेत बुधवारचे दर

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, 'हे' आहेत बुधवारचे दर

Gold, Silver - जाणून घ्या सोन्या-चांदीचे आजचे दर

  • Share this:

मुंबई, 31 जुलै : काल सोनं-चांदी महाग झाली होती. पण आज सोन्याचा दर 100 रुपयांनी कमी होऊन 35,780 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय. औद्योगिक क्षेत्रात चांदीच्या नाण्यांना मागणी वाढलीय. त्यामुळे चांदी 70 रुपयांनी वाढलीय. शिवाय चांदी 42,120 रुपये प्रति किलोग्रॅमवर गेलीय. न्यूयाॅर्कमध्ये सोनं 1,430.70 डाॅलर प्रति औंस आहे. तर चांदी 16.54 डाॅलर प्रति औंस आहे.

घट होण्याचं कारण

सोन्याच्या दरात घसरण झालीय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं स्थिर राहिलं. गुंतवणूकदार अमेरिकन केंद्रीय फेडरल रिझर्व्ह बैठकीच्या निकालांची  वाट पाहतायत. असं समजलं जातंय की अमेरिकेची केंद्रीय बँक एका दशकात पहिल्यांदा बेंचमार्क कर्जाच्या दरात कपात करू शकतात.

कार खरेदी करताय? मग सरकारनं बदललेले हे नियम पाहाच

सोन्याचे दर

दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमतीत 100 रुपयांनी कमी होऊन 35,780 रुपये झालीय. तर 99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 35,610 रुपये प्रति 10 ग्रॅम झालीय. गिन्नी सोन्याची किंमत 27,500 रुपये प्रति 8 ग्रॅमवर स्थिर राहिलीय.

20 रुपयात उघडा Post Office मध्ये खातं आणि मिळवा मोफत 'या' सुविधा

चांदीची चमक

चांदीचा भाव 70 रुपयांनी वाढून 42,120 रुपये आणि साप्ताहिक डिलिवरीवाल्या चांदीचा भाव195 रुपयांनी वाढून 41,434 रुपये प्रति किलोग्रॅम झाला. चांदीच्या नाण्यांना चांगली मागणी आहे. चांदीचा दर 1000 रुपये प्रति शेकडा वाढलाय. चांदीचा लिवाली भाव 85,000 रुपये आणि बिकवाली भाव 86,000 रुपये प्रति शेकडा राहिला.

पुढील काही महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 500 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे.

VIDEO : आणखी आमदार संपर्कात, पण गिरीश महाजनांनी व्यक्त केली ही शंका

Published by: Sonali Deshpande
First published: July 31, 2019, 7:50 PM IST
Tags: gold

ताज्या बातम्या