सावधान! सोनं खरेदीबाबत आजपासून नवा नियम, चूक झाल्यास होणार तुरुंगवास

सावधान! सोनं खरेदीबाबत आजपासून नवा नियम, चूक झाल्यास होणार तुरुंगवास

सोनं खरेदीबाबत केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नव्या नियमाची आजपासून अंमलबजावणी.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जानेवारी: मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर गृहिणींना मोठा फायदा होणार आहे. सोन्याच्या खरेदीदरम्यान होणाऱ्या ग्राहकांच्या फसवणुकीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारनं नवा नियम जारी केला आहे. या नियमाची अंमलबजावणी आजपासून केली जाणार आहे. सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग सक्तीचं केलं जाणार आहे. त्या दागिन्यामध्ये किती शुद्ध सोनं वापरलं गेलंय हे हॉलमार्किंममुळे कळू शकतं. यासाठी सराफांना लायसन्स दिलं जाणार आहे. हे लायसन्स सराफाकडे असणं आवश्यक आहे. होलमार्क दागिन्यांबाबत होणारी फसवणून टाळण्यासाठी ह्या नियमाची अंमलबजावणी केली जात आहे.

ग्राहकांना काय होणार फायदा?

केडिया कमोडिटीचे एमडी अजय केडिया सांगतात, देशात सोन्याच्या दागिन्यांचं हॉलमार्किंग करणं याआधी ऐच्छिक होतं. ह्या नियमामुळे सगळ्या सराफांना दागिन्यांची विक्री करण्यासाठी हॉलमार्किंग करणं सक्तीचं आहे.

याआधी सोन्याची गुणवत्ता तपासण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती. त्यामुळे ग्राहकांना कमी गुणवत्तेचं सोनंही विकलं जात होतं आणि पैसे मात्र शुद्ध सोन्याचे घेतले जायचे.

नियम पाळला नाही तर शिक्षा

देशभरात 234 जिल्ह्यांमध्ये 892 हॉलमार्किंग केंद्रं सुरू करण्यात आली आहेत. हॉलमार्किंगचा नियम पाळला नाही तर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. याप्रकरणी दंडात्मक कारवाई किंवा तुरुंगवासही होऊ शकतो. ग्रामीण भागातल्या सराफांना मात्र यातून सूट देण्यात आली आहे. तिथे अजून हॉलमार्किंगची केंद्र व्हायची आहेत. त्यासाठी अजून 1 वर्ष लागेल.

सोन्याचे दर घटले

अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारविषयक करार होण्याची चिन्हं असल्याने जगभरात सोन्याच्या किंमती (Gold Price Down)खाली आल्या आहेत. याचा परिणाम भारतातल्या बाजारावरही झालाय. सोन्याच्या किंमती 61 रुपयांनी कमी झाल्यात. त्याचवेळी चांदीचे दरही खाली आले. चांदीच्या किंमती 602 रुपयांनी घसरल्या आहेत. सोन्याच्या किंमतींनी 8 जानेवारीला उच्चांक गाठला होता. आता मात्र हे भाव घटले आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव मंगळवारी 40 हजार 422 रुपये प्रतितोळा होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2020 11:20 AM IST

ताज्या बातम्या