Home /News /money /

सोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण, चांदी 5781 रुपयांनी उतरली

सोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण, चांदी 5781 रुपयांनी उतरली

अमेरिकन डॉलरचे मुल्य वधारल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव उतरले आहेत. यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर 672 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत

    नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : अमेरिकन डॉलरचे मुल्य वधारल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव (Gold Rates) उतरले आहेत. यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today) 672 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात एक किलोग्रॅम चांदीची किंमत (Silver Price Today) 5781 रुपये प्रति किलोने कमी झाली आहे. तज्ज्ञांच्या मते विदेशी बाजारात सोन्याचे भाव 3 टक्क्यांनी घसरून महिनाभरातील सर्वात खालच्या स्तरावर जाऊन पोहोचले आहेत. कॉमेक्सवर सोन्याचे दर 1900 डॉलर प्रति औंस पेक्षाही कमी झाले आहेत. मात्र किंमती आणखी घसरतील अशी शक्यता कमी आहे. सोन्याचे नवे दर (Gold Price on 22nd September 2020)   एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते (HDFC Securities) दिल्लीमध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर 672 रुपये प्रति तोळाने उतरले आहेत. यानंतर सोन्याचे दर 51,328 रुपये प्रति तोळावर आले आहेत. सोमवारी सोन्याचे भाव 52,000 रुपये प्रति तोळा इतके होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कमी होऊन 1900 डॉलर प्रति औंसवर गेले आहे. चांदीचे नवे दर  (Silver Price on 22nd September 2020) सोन्याप्रमाणेच चांदीचे दर देखील मोठ्या प्रमाणात उतरले आहेत. मंगळवारी चांदीचे दर 5,781 रुपये प्रति किलोने घसरल्यानंतर किंमती 61,606 रुपयांवर पोहोचल्या आहेत. सोमवारी चांदीचे दर 67,387 रुपये प्रति किलो होते. का उतरले सोन्याचांदीचे दर? एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनिअर अनालिस्ट तपन पटेल यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री घटल्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात झाला आहे. परिणामी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 672 रुपयांनी उतरले आहेत. तपन पटेल यांच्या मते, कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी डॉलरमध्ये आता सुरक्षित गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अमेरिकी डॉलकमध्ये तेजी आहे. यामुळे सोन्याच्या किंमती आणखी घसरू शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold

    पुढील बातम्या