मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सोन्याचे दर वाढले तर चांदीची घसरण सुरूच, खरेदीआधी जाणून घ्या आजचे भाव

सोन्याचे दर वाढले तर चांदीची घसरण सुरूच, खरेदीआधी जाणून घ्या आजचे भाव

आठवड्याच्या चौथ्या दिवशी सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून औद्योगिक मागणी घटल्यामुळे चांदीचे दर सतत उतरत आहेत

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 19 मार्च : आठवड्याच्या चौथ्या दिवशी सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मुल्य कमी झाल्यामुळे सोन्याचे दर आज (Gold Price today) पुन्हा वाढले आहेत. गुरुवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति तोळा 31 रुपयांनी वाढली आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक मागणी कमी झाल्यामुळे चांदीच्या किंमती (Silver Price today) उतरल्या आहेत. प्रति किलो चांदीची किंमत 190 रुपयांनी कमी झाली आहे. HDFC सिक्योरिटीजचे सीनिअर अनालिस्ट यांच्या मते भारतामध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये आलेल्या कमजोरीमुळे सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. सोन्याचे आजचे दर गुरुवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव 31 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे प्रति तोळा सोन्याची किंमत 40,687 रुपयांवरून 40,718 रुपयांवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1,482 डॉलर प्रति औंस आहे. चांदीचे आजचे दर गुरुवारी चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीचे दर प्रति किलो 190 रुपयांनी कमी झाले आहेत. परिणामी चांदीचे दर प्रति किलो 35,444 रुपयांवर पोहोचले आहेत. बुधवारी चांदीची किंमत 35,634 रुपयांवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 11.97 डॉलर प्रति औंसवर स्थिर आहे. कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. परिणामी या क्षेत्रातील चांदीची मागणी देखील कमी झाली आहे. सोन्याच्या दागिन्यांची मागणी घटली पीटीआय वृत्तसंस्थेच्या मते कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे देशातील Gems and Jewellery व्यापाराची चमक कमी होत आहे. दररोज कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे या उद्योगातील मागणी 75 टक्क्यांनी कमी झाली आहे. आता केवळ 20 ते 25 टक्के एवढाच व्यवहार या उद्योगामध्ये होत आहे. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काऊन्सिलचे अध्यक्ष अनंतर पद्मनाभन यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘दागिन्यांच्या दुकानात ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. सर्वत्र भीतीचं वातावरण असल्यामुळे रिटेलर्स केवळ 20 ते 25 टक्के व्यवहारच करू शकत आहेत.’
First published:

पुढील बातम्या