मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Prices Today: 2 दिवसात तब्बल 1600 रुपयांनी वाढले सोन्याचे भाव, चांदीलाही झळाळी

Gold Prices Today: 2 दिवसात तब्बल 1600 रुपयांनी वाढले सोन्याचे भाव, चांदीलाही झळाळी

Gold Silver Rates: भारतात गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये प्रति तोळा 1600 रुपयांपेक्षा अधिक तेजी आली आहे. तर चांदीही 2700 वधारली आहे.

Gold Silver Rates: भारतात गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये प्रति तोळा 1600 रुपयांपेक्षा अधिक तेजी आली आहे. तर चांदीही 2700 वधारली आहे.

Gold Silver Rates: भारतात गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये प्रति तोळा 1600 रुपयांपेक्षा अधिक तेजी आली आहे. तर चांदीही 2700 वधारली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर:  धनत्रयोदशी आणि दिवाळीमुळे नोव्हेंबर महिन्यात सोन्याचांदीच्या दरात वाढ (Gold and Silver prices) झाली आहे.  देशात गेल्या दोन दिवसात सोन्याचे दर 1600 रुपये प्रति तोळा तर चांदीचे दर 2700 रुपये प्रति किलोने वाढले आहेत. सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे किंमतीचा ग्राफ देखील चढताच आहे. HDFC सिक्योरिटीजच्या विश्लेषकांच्या मते येणाऱ्या आठवड्यात सोन्याची किंमत मोठ्या  प्रमाणात वाढू शकते. देशातील सराफा बाजारात शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी तेजी होती. शुक्रवारी चांदी देखील वधारल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी मल्टीपल कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर वायदा सोन्याची (Gold futures) किंमत 0.6 टक्केने वधारून 52,337 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत आहे. तर चांदीचे भाव 2.6 टक्केने अर्थात 1702 रुपये प्रति किलोने वाढली आहे. यानंतर चांदीचे दर 65,355 रुपये प्रति किलो झाली होती. देशातील सोन्याचे दर तीन महिन्यातील सर्वोच्च स्तरापर्यंत पोहोचण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीबाबत बोलायचे झाले तर, अमेरिकेत जो बायडन (Joe Biden) यांचा विजय जवळपास निश्चित झाल्याने सोन्याच्या किंमतीत (Spot Gold) वाढ झाली आहे. (हे वाचा-LICची बेस्ट पॉलिसी! दर महिन्याला मिळतील 36,000, एकदाच भरावा लागणार प्रीमियम) या कारणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढले आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत वाढून 1,950 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. तर चांदीचे भाव 25.44 डॉलर प्रति औंसवर आहेत. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे दर 0.18 टक्केने वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचे दर 1,950.40 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. HDFC सिक्सोरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांच्या मते अमेरिकेत सत्ता परिवर्तन होण्याबरोबरच जास्त आर्थिक प्रोत्साहन पॅकेज मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ होते आहे. (हे वाचा-Post Office Scheme: दरमहा 10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीनंतर मिळतील 16 लाख) मोदी सरकार देत आहे स्वस्त सोने खरेदीची संधी सरकार सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड स्कीम 2020-21 (Sovereign Gold Bond Scheme 2020-21) सी​रीज VIII सोमवारपासून अर्थात 9  नोव्हेंबरपासून सुरू करत आहे. 13 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला हे सब्सक्रिप्शन खरेदी करता येईल. यावेळी आरबीआयकडून सोन्याचे भाव 5,177 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आले आहे.
First published:

Tags: Gold, Gold and silver prices today

पुढील बातम्या