4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी तर 2500 रुपयांनी कमी झाले सोन्याचे दर, आजही कमी होणार किंमती

4 दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी तर 2500 रुपयांनी कमी झाले सोन्याचे दर, आजही कमी होणार किंमती

Gold Price Today- गेल्या चार दिवसात सोन्याचे भाव जवळपास 2500 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. आधीच्या सत्रात सोन्याचे भाव 950 रुपये प्रति तोळाने कमी झाले होते. बुधवारी चांदीचे दर देखील 4.5 टक्के किंवा 2700 रुपये प्रति किलोने घसरले होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर कमी होताना दिसत आहेत. आज या आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी सोन्याच्या वायदे बाजारात एमसीएक्सवर ऑक्टोबर डिलिव्हरीचे सोने देखील कमी झाले आहे. वायदे बाजारात सोन्याचे दर 0.45 टक्क्यांनी कमी होऊन 50 हजार रुपये प्रति तोळाच्या देखील खाली आले आहेत. सध्या हे दर 49,293 रुपये प्रति तोळा आहेत. तर वायदे बाजारात चांदी देखील 3 टक्क्यांनी उतरली आहे. यानंतर चांदीचे भाव 56,710 रुपे प्रति किलोग्राम झाले आहेत.

तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Price Today) सलग घसरण होण्याचा आजचा तिसरा दिवस आहे. अमेरिकन डॉलरमध्ये आलेल्या तेजीमुळे परदेशी बाजारात (Gold Price Down)सोन्याचे दर 2 टक्क्यांनी कमी होऊन 1862 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. त्यामुळे देशांतर्गत बाजारात देखील सोनेखरेदी करणे स्वस्त झाले आहे.

सोने 2500 रुपयांनी तर चांदी 11 हजार रुपयांनी उतरली

गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचांदीची झळाळी उतरल्याचे पाहायला मिळते आहे. चार दिवसात सोने आतापर्यंत 2500 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. आधीच्या सत्रात सोन्याचे भाव 950 रुपये प्रति तोळाने कमी झाले होते. बुधवारी चांदीचे दर देखील 4.5 टक्के किंवा 2700 रुपये प्रति किलोने घसरले होते.

(हे वाचा-Fit India Movement : क्रिकेटमधील Yo-Yo Test विषयी मोदींनी विराटला विचारला सवाल)

विदेशी  बाजारात देखील घसरले सोन्याचे दर

आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 0.3 टक्क्यांनी घसरून 1,858.08 डॉलर प्रति औंसवर आली आहे. वृत्त संस्था रॉयटर्सच्या मते युरोपमध्ये आर्थिक मंदीच्या संकेतामुळे अमेरिकन डॉलर इंडेक्स अन्य चलनांच्या तुलनेत आठ आठवड्यांच्या सर्वोच्च स्तराच्या जवळ पोहोचला होता. याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर देखील होत आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 24, 2020, 3:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading