Gold Price Today: सोन्याच्या दरात सलग पाचव्या दिवशी घसरण; किमती वधारण्याआधी खरेदीची सुवर्णसंधी

Gold Price Today: सोन्याच्या दरात सलग पाचव्या दिवशी घसरण; किमती वधारण्याआधी खरेदीची सुवर्णसंधी

Gold Silver Price, 31 March 2021: सध्या देशात लग्नाचा मोसम सुरू आहे. अशा परिस्थितीत सोन्याचे दर सातत्याने घसरत आहेत. आज सलग 5 व्या दिवशी सोन्याच्या किंमती (Gold rate) खाली आल्या आहेत. तर चांदीच्या किंमतीही (Silver Rate) घट नोंदली गेली आहे. त्यामुळे सोन्याच्या दराने वर्षाचा नीचांकी स्तर गाठला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 मार्च: सध्या देशात लग्नाचा मोसम सुरू आहे. अशा परिस्थितीत सोन्याचे दर सातत्याने घसरत आहेत. आज सलग 5 व्या दिवशी सोन्याच्या किंमती (Gold rate) खाली आल्या आहेत. तर चांदीच्या किंमतीतही (Silver Rate) घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे सोन्याच्या दराने वर्षाचा निच्चांकी स्तर गाठला आहे. आज एमसीएक्सवरील जून सोने वायद्यात 0.3 टक्क्यांची घसरण झाली असून 44,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बाजार बंद झाला आहे. गेल्या सात दिवसांत पाच वेळा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. दुसरीकडे चांदीच्या किमती 0.8 टक्क्यांनी खाली येवून 62,617 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळत आहे.

सोन्या- चांदीचे नवीन दर

दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर 44,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहेत. हा दर गेल्या वर्षभरातला सर्वात नीचांकी दर आहे. बुधवारी चांदीच्या भावातही घट दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात चांदीचे दर 0.8 टक्क्यांनी घसरून 62,617 रुपये प्रतिकिलोवर पोहचले आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव 24.01 डॉलर प्रति औंसवर कायम आहे. खरंतर गेल्या पाच दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. काल सोन्याचा दर 44,538 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तर चांदीचा दर 63,985 रुपये प्रतिकिलो होता.

सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होणार का?

तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे दरात झालेली घसरण फार काळ टिकू शकणार नाही.  डॉलरची किंमतीत झालेली घसरण, वाढत्या महागाईचा दबाव आणि चलनवाढीचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे.

हे ही वाचा- कर बचत आणि जास्तीत जास्त परतावा; गुंतवणुकीसाठी उत्तम अशा सरकारी योजना

सोने खरेदी करण्याची सुवर्ण संधी

सध्या देशांतर्गत बाजारात सोन्याला प्रचंड मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे लग्नाचा हंगाम सुरू आहे आणि सोन्याच्या किंमतीही खूप खाली आल्या आहेत. अशा परिस्थितीत मागणीचा दबाव आणखी वाढेल. त्यामुळे सध्या सोन्याच्या किंमतीत झालेली घसरण अल्पकाळ टिकणार आहे. सोन्याच्या किमती पुन्हा लवकरच उसळी घेईल. सोन्याचे दागिने विकत घेण्याची ही सुवर्ण संधी आहे.

Published by: News18 Desk
First published: March 31, 2021, 11:49 AM IST

ताज्या बातम्या