Home /News /money /

Gold Prices Today: आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीनंतर देखील भारतात सोन्याचांदीला झळाळी, इथे वाचा नवे दर

Gold Prices Today: आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीनंतर देखील भारतात सोन्याचांदीला झळाळी, इथे वाचा नवे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात (Global Market) सोन्याची स्पॉट प्राइज (Spot Gold) 0.37 टक्केने कमी झाली आहे. तरी देखील भारतीय बाजारात सोन्याची स्पॉट किंमत वाढली आहे.

    नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय बाजारात (Global Market) सोन्याची स्पॉट प्राइज (Spot Gold) 0.37 टक्केने कमी झाली आहे. तरी देखील भारतीय बाजारात सोन्याची स्पॉट किंमत वाढली आहे. देशांतर्गत गोल्ड स्पॉटमध्ये आज सोन्याची किंमत प्रति तोळा 50,560 रुपयाने सुरुवात झाली. रविवारी ही किंमत प्रति तोळा 50,550 रुपये  प्रति तोळा होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट किंमत घसरून 1892.7 प्रति औंस डॉलरवर आली आहे. अमेरिकेत नवीन स्टिम्यूलस पॅकेजची घोषणा होण्याची अपेक्षा वाढल्यानंतर आज देशांतर्गत वायदे बाजारात देखील सोने आणि चांदी (Gold and Silver Rates) महागली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर डिसेंबरच्या डिलीव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत  (Gold futures) 0.48 टक्के अर्थात 242 रुपयांनी वाढली आहे. सकाळी 10.30 वाजता एमसीएक्सवर डिसेंबरच्या डिलीव्हरीच्या सोन्याची किंमत 51,059 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत होती. (हे वाचा-SBI अलर्ट! या तारखांना नाही वापरता येणार YONO SBI APP, बँकेने पाठवला मेसेज) तर चांदीची वायदे किंमत देखील 1.30 टक्क्यांनी वाढली आहे. चांदीच्या वायदे किंमतीत 816 रुपयांची वाढ होऊन ती आज सकाळी 10.30 वाजता 63,700 रुपयांवर ट्रेड करत होती. सरकार देत आहे स्वस्त सोनेखरेदीची सुवर्णसंधी सरकारकडून पुन्हा एकदा स्वस्त सोने खरेदीची सुवर्णसंधी तुम्हाला मिळणार आहे. आजपासून सॉव्हरेन गोल्ड बाँडची (Sovereign Gold Bond Scheme) सातवी सीरिज जारी केली जाणार आहे.  सरकारकडून 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान सॉव्हरेन गोल्ड बाँडसाठीचे सब्सक्रिप्शन जारी केले जाणार आहे. (हे वाचा-आजपासून Discount दराने सोने खरेदीची संधी देत आहे सरकार, वाचा 10 महत्त्वाच्या गोष्टी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका निवेदनात असे म्हटले आहे की, या गोल्ड बाँडची किंमत प्रति ग्रॅम 5,051 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या गोल्ड बाँडची सेटलमेंट तारीख 20 ऑक्टोबर आहे. रिझर्व्ह बँकेच्या संमतीने जे गुंतवणूकदार याकरचा सब्सक्राइब करतील, त्यांनी ऑनलाइन पेमेंट केल्यास प्रति ग्राम 50 रुपयांची सूट देखील मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या