Gold Price Today : खुशखबर! सोन्याचांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3000 रुपयांनी उतरली

Gold Price Today : खुशखबर! सोन्याचांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3000 रुपयांनी उतरली

गेल्या पंधरवड्यामध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये बराच चढउतार पाहायला मिळाला आहे. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्यानंतर त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर देखील झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : गेल्या पंधरवड्यामध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये बराच चढउतार पाहायला मिळाला आहे. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्यानंतर त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर देखील झाला आहे. बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव (Gold Price Today) 640 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. तर चांदीचे भाव (Silver Prices Today) 3000 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत.  वाढले आहेत. तज्ज्ञांच्या मते अमेरिकन डॉलरचे मुल्य वधारल्यामुळे परदेशी बाजारात सोन्याचे भाव कमी झाले आहेत.

सोन्याचे आजचे दर (Gold Price on 19th August 2020)

एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते, बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत 54,909 रुपये प्रति तोळावरून 54,269 रुपये प्रति तोळा झाली आहे. सोन्याच्या किंमती 640 रुपये प्रति तोळाने कमी झाल्या आहेत.  मुंबईमध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किंमती कमी होऊन 53424 रुपये प्रति तोळा आहेत.

(हे वाचा-SBI ग्राहकांसाठी अलर्ट! बँकेत पैसे भरण्याच्या आणि काढण्याच्या नियमात बदल)

चांदीचे आजचे दर (Silver Price on 19th August 2020)

बुधवारी सोन्याप्रमाणेच चांदीचे भाव देखील मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. चांदीचे भाव 3112 रुपये प्रति किलोने कमी झाल्या आहेत. त्यामुळे चांदीचे भाव 72,562 रुपयांवरून 69,450 रुपये प्रति किलो झाले आहेत. मुंबईमध्ये चांदीचे दर 67135 रुपये प्रति किलो आहेत.

(हे वाचा-ऑनलाइन औषधविक्री करणाऱ्या Netmedsमध्ये रिलायन्सने खरेदी केली मोठी भागीदारी)

आता पुढे काय?

कोटक सिक्योरिटीजने अशी माहिती दिली आहे की,  सोन्यामध्ये गेल्या काही काळापासून खूप अस्थिरता राहिली आहे आणि ही अस्थिरता काही काळासाठी अशीच राहिल. गुंतवणूकदारांच्या नजरा अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या मिनिट्सवर आहेत. बुधवारी उशिरा हे मिनिट्स जारी केले जाणार आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 19, 2020, 5:57 PM IST

ताज्या बातम्या