सोन्याचांदीच्या दरात मोठी घसरण, अखेर भारतात सोनं 50 हजारांखाली येण्याची शक्यता वाढली

सोन्याचांदीच्या दरात मोठी घसरण, अखेर भारतात सोनं 50 हजारांखाली येण्याची शक्यता वाढली

सोन्याच्या किंमती (Gold Price on 24th Sept 2020) आज सलग तिसऱ्या दिवशी कमी झाल्या आहेत. अमेरिकन डॉलरमध्ये आलेल्या तेजीमुळे विदेशी बाजारात (Gold Price Down)सोन्याचे दर 2 टक्क्यांनी कमी होऊन 1862 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : सोन्याच्या किंमती आज सलग तिसऱ्या दिवशी कमी झाल्या आहेत. अमेरिकन डॉलरमध्ये आलेल्या तेजीमुळे विदेशी बाजारात (Gold Price Down)सोन्याचे दर 2 टक्क्यांनी कमी होऊन 1862 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. दरम्यान देशांतर्गत बाजारात सोने गेल्या महिन्यातील सर्वोच्च स्तरापेक्षा 6000 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहे.

गेल्या महिन्यात सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. या रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्यानंतर आतापर्यंत जवळपास 6000 रुपयाांनी सोने उतरले आहे. 7 ऑगस्ट रोजी एमसीएक्सवर सोन्याचे दर 56,000 रुपये प्रति तोळापेक्षाही अधिक होते. तर सराफा बाजारात सोन्याचे भाव 56,200 प्रति तोळावर पोहोचले होते. आता सोन्याचे दर 51 हजार प्रति तोळाच्या आसपास आहेत.

आज काय होईल?

तज्ज्ञांच्या मते देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या होत्या, जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आली होती. त्याचप्रमाणे आता या घसरणीनंतर देशात सोन्याच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. आज देखील सोन्याचे दर घसरू शकतात. बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर कमी होऊन 50,750 रुपये प्रति तोळा झाले होते. सोन्याचे दर 614 रुपयांनी कमी झाले होते.

(हे वाचा-KKR-Reliance Retail deal: केकेआर रिलायन्स रिलेटमध्ये गुंतवणार 5550 कोटी)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घटल्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होत आहे. आधीच्या ट्रेडमध्ये सोने 51,364 रुपये प्रति तोळा होते. HDFC सिक्योरिटीजच्या मते चांदीचे दर देखील 1898 रुपये प्रति किलोने कमी होत 59,720 रुपये प्रति किलोग्राम झाले आहेत. आधीच्या सत्रात चांदीचे दर 61,618 रुपये प्रति किलोग्राम झाले होते.

(हे वाचा-सावधान! OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी)

अशाप्रकारे सोन्याचांदीच्या (Gold and Silver Price) किंमती कमी होण्याचे सत्र सुरूच आहे. बुधवारी कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याच्या तुलनेत चांदीमध्ये चारपट घसरण झाली आहे. याठिकाणी सोन्याचे दर 683 रुपयांनी उतरले तर चांदी 2800 रुपयांनी कमी झाली आहे.

सोन्याचांदीच्या किंमती कमी होण्याचे कारण

रोना व्हायरसच्या (Coronavirus) संक्रमणाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी डॉलरमध्ये आता सुरक्षित गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. डॉलरमध्ये सेफ हेवन म्हणून गुंतवणूक केली जात आहे. डॉलरची किंमती  मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किंमती घसरत आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 24, 2020, 9:35 AM IST

ताज्या बातम्या