Home /News /money /

Gold Price Today: सोने दर पुन्हा वधारला, तर चांदीचा भाव उतरला; तपासा मुंबई-पुण्यातील आजचा रेट

Gold Price Today: सोने दर पुन्हा वधारला, तर चांदीचा भाव उतरला; तपासा मुंबई-पुण्यातील आजचा रेट

सोने दरात (Gold Price Today) पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोने दर वधारला आहे. तर चांदीच्या दरात (Silver Price Today) घसरण झाली आहे.

    नवी दिल्ली, 21 जानेवारी : सोने दरात (Gold Price Today) पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोने दर वधारला आहे. तर चांदीच्या दरात (Silver Price Today) घसरण झाली आहे. सोने दर 0.02 टक्क्यांच्या काहीशा वाढीसह ट्रेड करत आहे. तर चांदीच्या दरात 0.38 टक्क्यांची घसरण झाली आहे. काय आहे आजचा सोन्याचा दर - मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज फेब्रुवारी डिलीव्हरी सोन्याचा दर 0.02 टक्क्यांच्या काहीशा वाढीसह 48,327 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. काय आहे चांदीचा दर - आज चांदीच्या दरात 0.38 टक्क्यांची घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव 65,130 रुपयांवर पोहोचला आहे.

    हे वाचा - SBI च्या ग्राहकांसाठी खूशखबर! आता फसवून कुणी काढू शकत नाही तुमच्या ATM मधून पैसे

    24 कॅरेट सोन्याचा दर (24 karat Gold price) -
    शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
    मुंबई49600 रुपये49590 रुपये
    पुणे49380 रुपये49370 रुपये
    नाशिक49380 रुपये49370 रुपये
    नागपूर49600 रुपये49600 रुपये
    22 कॅरेट सोन्याचा दर (22 karat Gold price)-
    शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
    मुंबई47600 रुपये47590 रुपये
    पुणे46840 रुपये46830 रुपये
    नाशिक46840 रुपये46830 रुपये
    नागपूर47600 रुपये47590 रुपये
    चांदीचा दर (Silver Price in Maharashtra) -
    शहरआजचा दर (प्रति किलो)कालचा दर (प्रति किलो)
    मुंबई65400 रुपये64600 रुपये
    पुणे65400 रुपये64600 रुपये
    नाशिक65400 रुपये64600 रुपये
    नागपूर65400 रुपये64600 रुपये
    कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

    हे वाचा - चुकून दुसऱ्याच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले तर काय करावं?

    मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today

    पुढील बातम्या