• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Gold Price Today: काही दिवसांच्या घसरणीनंतर आज 400 रुपयांनी महागलं सोनं, चांदीचा भावही वधारला

Gold Price Today: काही दिवसांच्या घसरणीनंतर आज 400 रुपयांनी महागलं सोनं, चांदीचा भावही वधारला

सोने दरात मंगळवारी 0.25 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर सोन्याचा दर 47,171 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. आज सोने दरात 400 रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : मागील सत्रातील घसरणीनंतर आज सोने दरात वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने दरात (Gold Price Today) मंगळवारी 0.25 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर सोन्याचा दर 47,171 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. आज सोने दरात 400 रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे. तर चांदीच्या दरातही (Silver Price Today) 0.35 टक्के वाढ झाली आहे. चांदीचा भाव वाढल्यानंतर आता 63,801 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव - गुडरिटर्न वेबसाईटनुसार, देशाच्या राजधानीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 50790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याशिवाय चेन्नईत 48,720 रुपये, मुंबईत 47,490 रुपये आणि कोलकातामध्ये 49640 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. 3 सप्टेंबरपर्यंत स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी - सरकारकडून स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी आहे. 30 ऑगस्टपासून सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्किम 2021-22 च्या सहाव्या सीरिजचीविक्री सुरू झाली आहे. यासाठी इश्यू प्राईज 4,732 रुपये प्रति ग्रॅम आहे. ही स्किम पाच दिवसांसाठी सुरू आहे.

    Sovereign Gold Bond: इतकं स्वस्त सोनं कुठेच मिळणार नाही! एका तोळ्यावर 'इतकी' सूट

    Missed Call द्वारे जाणून घ्या लेटेस्ट गोल्ड रेट - सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या सेमेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल. अशी तपासा सोन्याची शुद्धता - सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.
    Published by:Karishma
    First published: