मराठी बातम्या /बातम्या /मनी /सोन्याची किंमत पुन्हा वाढली; वाचा काय आहेत आजचे दर

सोन्याची किंमत पुन्हा वाढली; वाचा काय आहेत आजचे दर

सूत्रांच्या माहितीनुसार कोरोनाकाळात गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करण्यावर भर दिला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार कोरोनाकाळात गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करण्यावर भर दिला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार कोरोनाकाळात गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करण्यावर भर दिला आहे.

  नवी दिल्ली, 19 एप्रिल : कोरोनामुळे (Corona) एकूण अर्थिक व्यवस्थेवर परिणाम झाल्याचं दिसू लागलं आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा उद्योग धंद्यावरही मोठा परिणाम झाला आहे. या सर्व स्थितीत गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सोनं(Gold) खरेदीकडे कल अधिक असल्याचं दिसून येतं.

  मागील वर्षी देखील काहीशी अशीच स्थिती होती. परिणामी सोन्याची आयात (Gold Import)वाढल्याचे दिसून आले. आता देखील सोन्याचे दर पुन्हा तेजीत असल्याचे दिसत आहे तर चांदीच्या दरात घट झाली. एमसीएक्सवर सोन्याचा जून वायदा 116 रुपये म्हणजेच 0.24 टक्क्यांनी वाढून 47469 रुपये प्रति 10 ग्रॅम असा झाला. चांदीचा दर 0.46 टक्क्यांनी घसरुन 68,367 प्रति किलोग्रॅम झाला. मात्र सोन्याचे दर सर्वोच्च कालीन दराच्या तुलनेत 9085 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहेत. कोरोनाची गंभीर स्थिती बघता सोन्याचे दर गतवर्षी प्रमाणे गगनाला भिडू शकतात.

  मार्केट तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सोन्याचे दर (Gold Price)पुन्हा एकदा 50,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. कोरोनाचे संक्रमण वाढल्यानं निर्माण झालेली अर्थिक अनिश्चितता,बाँड-यील्डमध्ये पडझड,डॉलरची (Dollar)कमकुवत स्थिती आणि सोन्याला जगभरातून असलेली मागणी पाहता,दर तेजीत राहण्याची शक्यता आहे.

  हे ही वाचा-15 दिवसांत 6 टक्के वाढली किंमत; पुन्हा प्रतितोळा 56,000 रुपये गाठणार सोनं?

  24 कॅरेट सोन्याचा भाव

  देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा (24Caret Gold)भाव आज 50,430 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. याशिवाय मुंबईत 46020,चेन्नईत 48580 आणि कोलकता येथे 49020 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

  जागतिक बाजारात सोने-चांदीची स्थिती

  जागतिक बाजारात डॉलरची स्थिती कमकुवत असल्याने सोन्याचे दर तेजीत आहेत. स्पॉट सोन्याचे दर 0.1 टक्क्यांनी वधारले आणि ते 1777 डॉलवर बंद झाले. डॉलर इंडेक्स 0.13 टक्क्यांनी वाढून 91.66 वर पोहोचला. हा स्तर या महिन्यातील निचतम पातळीवर आहे. अन्य महागडया धातूंमध्ये चांदी (Silver)0.6 टक्क्यांनी घसरुन 25.81 डॉलर प्रति ग्रॅम वर आली. प्लॅटिनमचे (Platinum)दर 1203.61 डॉलर राहिले.

  कोरोना काळात गुंतवणुकदारांनी केली मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी

  सूत्रांच्या माहितीनुसार कोरोनाकाळात गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करण्यावर भर दिला आहे. मागील 2020-21 अर्थिक वर्षात सोन्याची आयात 22.58 टक्क्यांनी वाढून 34.6 अब्ज डॉलर म्हणजेच 2.54 लाख कोटी रुपयांवर पोहोचली. आकडेवारीनुसार,मागील अर्थिक वर्षात चांदीची आयात(Import)71 टक्क्यांनी घटली. मागील वर्षी चांदीची आयात 79.1 कोटी डॉलर झाली होती.

  First published:
  top videos

   Tags: Corona virus in india, Gold and silver, Gold and silver prices today