Home /News /money /

आठवड्याच्या सुरूवातीलाच सोन्याला झळाळी तर चांदी उतरली, सोमवारचे दर इथे पाहा

आठवड्याच्या सुरूवातीलाच सोन्याला झळाळी तर चांदी उतरली, सोमवारचे दर इथे पाहा

गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमती जवळपास 3000 रुपयांनी कमी झाल्या होत्या. मात्र आज आठवड्याच्या सुरूवातीलाच सोन्याच्या किंमती (Gold Prices today) काहीशा वधारल्या आहेत.

    नवी दिल्ली, 16 मार्च : गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमती जवळपास 3000 रुपयांनी कमी झाल्या होत्या. मात्र आज आठवड्याच्या सुरूवातीलाच सोन्याच्या किंमती (Gold Prices today) काहीशा वधारल्या आहेत. रुपयाच्या मुल्यामध्ये झालेली घसरण आणि सोन्याच्या दरात आंतराष्ट्रीय बाजारात वाढ झाल्यामुळे देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति तोळा 455 रुपयांनी वाढली आहे. मात्र चांदीची झळाळी मात्र उतरल्याचं पाहायला मिळालं. औद्योगिक मागणी कमी झाल्यामुळे चांदीच्या किंमती उतरल्या आहेत. प्रति किलो चांदीची किंमत  1,283 रुपयांनी कमी झाली आहे. (हे वाचा- खूशखबर! YES बँकेवरील निर्बंध या दिवशी हटवणार, ग्राहकांनी सोडला सुटकेचा निःश्वास) HDFC सिक्योरिटीजच्या मते,  कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे देशांतर्गत शेअर मार्केट कोसळलं आहे. सोमवारी सेन्सेक्स निर्देशांक 2,700 अंकानी घसरला आहे. अशावेळी एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. सोन्याचे नवे दर (Gold Price 16th March 2020) सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव 455 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे प्रति तोळा सोन्याची किंमत 41,155 रुपयांनी वाढून 41 हजार 610 रुपयांवर पोहोचली आहे. शुक्रवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याची किंमत 1,097 रुपयांनी कमी झाली होती.  आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1,539 डॉलर प्रति औंस आहे. चांदीचे नवे दर (Silver Rate 16th March 2020) सोमवारी चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीचे दर प्रति किलो 1,283 रुपयांनी कमी झाले आहेत. परिणामी चांदीचे दर प्रति किलो 41,587 रुपयांवरून 40, 304 रुपयांवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 15.56 डॉलर प्रति औंस आहे. सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम कशामुळे? HDFC सिक्योरिटीजचे सीनियर अॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मुल्य 36 पैशांनी कमी झालं आहे. रुपयाची किंमत कमी झाल्यामुळे त्याचा फायदा सोन्याला झाला आहे. (हे वाचा- शाळा बंद असल्याने शिक्षिकेने मुलांच्या घरी जाऊन पोहोचवलं मिड-डे मील) तर मोतीलाल ओसवाल फायनांशिअल सर्व्हिसेज के व्हाइस प्रेसिडेंट (कमोडिटी रिसर्च) नवनीत दमानी यांनी सांगितलं की,  गेल्या आठवड्यात जबरदस्त घसरण झाल्यानंतर आता सोन्याच्या किंमतीमध्ये 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रील बाजारात घसरण झाल्यामुळे हा परिणाम झाला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold and silver prices today

    पुढील बातम्या