सोन्याचे दर पुन्हा चाळीशीपार! इथे जाणून घ्या काय आहे बुधवारचा भाव

सोन्याचे दर पुन्हा चाळीशीपार! इथे जाणून घ्या काय आहे बुधवारचा भाव

बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति तोळा 311 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे मंगळवारी चाळीस हजारांपेक्षा कमी झालेले सोन्याचे दर पुन्हा एकदा चाळीशीपार झाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 18  मार्च : डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मुल्य कमी झाल्यामुळे आणि सोन्याची मागणी वाढल्यामुळे सोन्याचे दर आज (Gold Price today) पुन्हा वाढले आहेत. बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति तोळा 311 रुपयांनी वाढली आहे. मंगळवारी सोन्याची किंमत चाळीस हजारांच्या खाली उतरून 39 हजार 930 रुपयांवर बंद झाली होती.

(हे वाचा-Coronavirus मुळे ऑनलाइन खरेदीमध्ये वाढ, अ‍ॅमेझॉन देणार 1 लाख जणांना नोकऱ्या)

त्याचप्रमाणे औद्योगिक मागणी कमी झाल्यामुळे चांदीच्या किंमती (Silver Price today) उतरल्या आहेत. प्रति किलो चांदीची किंमत 468  रुपयांनी कमी झाली आहे. HDFC सिक्योरिटीजचे सीनिअर अनालिस्ट यांच्या मते भारतामध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये आलेल्या कमजोरीमुळे सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

सोन्याचे नवे दर (Gold Price 18th March 2020)

बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव 311 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे प्रति तोळा सोन्याची किंमत 39,930 रुपयांवरून 40,241 रुपयांवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1,490 डॉलर प्रति औंस आहे.

चांदीचे नवे दर (Silver Rate 18th March 2020)

बुधवारी चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीचे दर प्रति किलो 468 रुपयांनी कमी झाले आहेत. परिणामी चांदीचे दर प्रति किलो 36,416  रुपयांवरून 35,948  रुपयांवर पोहोचले आहेत. कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. परिणामी या क्षेत्रातील चांदीची मागणी देखील कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 12.38 डॉलर प्रति औंस आहे.

सोन्याच्या दागिन्यांची मागणी घटली

पीटीआय वृत्तसंस्थेच्या मते कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे देशातील Gems and Jewellery व्यापाराची चमक कमी होत आहे. दररोज कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे या उद्योगातील मागणी 75 टक्क्यांनी कमी झाली आहे. आता केवळ 20 ते 25 टक्के एवढाच व्यवहार या उद्योगामध्ये होत आहे.

संबधित-कोरोनामुळे सोने व्यापाराची चमक गायब, दागिन्यांची मागणी 75 टक्क्यांनी घटली

First published: March 18, 2020, 6:20 PM IST

ताज्या बातम्या