सोन्याला पुन्हा झळाळी तर चांदी मात्र उतरली, गुरुवारचे भाव इथे पाहा

सोन्याला पुन्हा झळाळी तर चांदी मात्र उतरली, गुरुवारचे भाव इथे पाहा

गुरुवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या भावात(Gold price today) वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीचे दर (Silver Prices today) मात्र उतरल्याचं पाहायला मिळाले. आज सोनेखरेदी करणाऱ्यांच्या खिशाला चाप बसणार आहे. कारण सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत वाढल्यामुळे सोन्याच्या दरात (Gold prices today) देशांतर्गत बाजारातही वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.  गुरुवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या भावात प्रति तोळा 266 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या दरावर (Silver prices today) फारसा परिणाम दिसून आला नाही. काल सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली होती तर चांदीचे दरही उतरले होते

आज हे आहेत सोन्याचे भाव

गुरुवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा 266 रुपयांनी वधारले आहेत. त्यामुळे सोन्याचे दर प्रति तोळा 41 हजार 218 रुपयांवरुन 41 हजार 484 रुपयांवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1 हजार 574 डॉलर प्रतिऔंस झालं आहे.

चांदीची झळाळी उतरली

औद्योगिक मागणी कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम चांदीच्या किंमतीवर झाला आहे. दिल्लीतील सराफा बाजारात चांदीचे दर प्रति किलो 55 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे चांदीची किंमत प्रति किलो 46 हजार 685 रुपयांवरुन 46 हजार 630 रुपयांपर्यंत उतरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 17.64 डॉलर प्रतिऔंस झाली आहे.

सोन्याच्या दरात वाढ कशामुळे?

एचडीएफसी सिक्युरीटीचे सीनिअर अनालिस्ट (कमोडिटी) तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार एकीकडे कोरोना व्हायरस आंतरराष्ट्रीय स्तरावर थैमान घालत आहे, त्यामुळे अनेकांना आर्थिक गुंतवणूक करणं आवश्यक आहे. अशावेळी सोन्यामध्ये गुंतवणूक एक उत्तम पर्याय आहे. त्याचप्रमाणे आज डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मुल्य कमी झाल्याचं पाहायला मिळालं. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मुल्य 10 पैशांनी घसरलं आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक वाढल्याने आणि रुपयाचं मुल्य घसल्यामुळे सोन्याचे भाव आज वाढले आहेत.

सोनं खरेदी करताना ही घ्या खबरदारी

-तुम्हाला सोनं किंवा चांदी खरेदी करायचं असेल सोन्याच्या दरांबद्दल जाणून घ्या. https://ibjarates.com/ या वेबसाइटवर जाऊन सोन्याच्या दरांबद्दल माहिती घ्या.

-IBJA द्वारे ठरलेले दर देशात सर्वमान्य असतात. असं असलं तरी या रेट्समध्ये 3 टक्के GST नसतो.

-असली सोनं 24 कॅरेटचं असतं पण त्याचे दागिने बनत नाहीत कारण ते मऊ असतं. दागिन्यांसाठी 22 कॅरट सोनं वापरलं जातं. यामध्ये 91. 66 टक्के सोनं असतं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 13, 2020 07:53 PM IST

ताज्या बातम्या