Home /News /money /

Gold Rates: दोन महिन्यातील सर्वात कमी स्तरावर पोहोचले सोन्याचे दर, वाचा आज काय होणार बदल

Gold Rates: दोन महिन्यातील सर्वात कमी स्तरावर पोहोचले सोन्याचे दर, वाचा आज काय होणार बदल

Gold Rates: गुरुवारी एमसीएक्स आणि दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्या होत्या. यानंतर आता सोन्याचे दर दोन महिन्यातील सर्वात कमी स्तरावर पोहोचले आहेत.

    मुंबई, 25 सप्टेंबर : गुरुवारी स्पॉट गोल्डच्या (Spot Gold Price) किंमतीमध्ये घसरण झाली आहे. फेस्टिव्ह सीझन सुरू होण्याआधी कोरोना व्हायरस पँडेमिक (Coronavirus Pandemic) मुळे अर्थव्यवस्थेमध्ये अनिश्चितता वाढली आहे. त्याचप्रमाणे बेरोजगारीचे प्रमाणे देखील वाढले आहे. या सर्वाचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किंमतीवर होत आहे. मल्टी कमोडिटीज एक्सचेंजवर (MCX)गुरुवारी सोन्याचे दर 613 रुपये प्रति तोळाने कमी होत 49,638 रुपये प्रति तोळा झाले आहेत. जगभरामध्ये भारतात दुसऱ्या क्रमांकाची सोन्याची विक्री होते. सर्वात जास्त विक्री चीनमध्ये होते. वायदे बाजारात देखील ऑक्टोबरच्या डिलीव्हरीचे सोने उतरले आहे. याठिकाणी 0.45 टक्के घसरण होत सोन्याचे दर 49,293 रुपये प्रति तोळावर आले आहेत. गेल्या काही दिवसात सोन्याचे दर 2500 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. डॉलरमध्ये आलेल्या तेजीचा परिणाम गेल्या महिन्यात सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. सध्या झालेल्या घसरणीनंतरही अधिकतर अनालिस्ट आणि ट्रेडर्स सोन्याच्या दराबद्दल आशावादी आहेत. सध्या सोन्याच्या किंमतीवर सर्वात जास्त परिणाम अमेरिकन डॉलरमुळे झाला आहे. या आठवड्यात अमेरिकन डॉलरमध्ये विशेष तेजी पाहायला मिळाली. (हे वाचा-बँक खात्यातून चोरी झाल्यानंतर हे काम केल्यास मिळतील तुमचे पैसे,RBIने दिली माहिती) तज्ज्ञांच्या मते विकसीत देशात व्याजदर जवळपास शुन्याजवळ पोहोचले आहेत. केंद्रीय बँकांनी बऱ्याच काळासाठी व्याजदरे कमी राहण्याचे संकेत दिले आहेत. अशावेळी अशी अपेक्षा केली जात आहे व्याजदर शुन्याच्या आसपास असल्याने सोन्यामध्ये केली जाणारी सुरक्षित गुंतवणूक वाढेल. कारण अनिश्चिततेच्या काळात सोन्याकडे सेफ हेवन म्हणून पाहिले जाते. त्यामुळे किंमतीमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. अमेरिकेत वाढणाऱ्या बेरोजगारीचा सोन्यावर परिणाम अमेरिकेतील साप्ताहिक बेरोजगारीच्या आकडेवारीमुळे असे समजते आहे की, ऑगस्टच्या अखेरीपर्यंत 3 कोटी अमेरिकन लोकं बेरोजगारी भत्त्याचा लाभ घेत आहेत. यानंतर अशी अपेक्षा वाढली आहे की, फेड रिझर्व्ह आणि अमेरिकन सरकार पुन्हा एकदा पॅकेजची घोषणा करू शकतात. जेणेकरून अर्थव्यवस्था रुळावर आणण्यास मदत होईल. जाणकारांच्या मते केंद्रीय बँका आता देखील अर्थव्यवस्थेमध्ये लिक्वीडिटी वाढवतील. सोन्याच्या किंमतीसाठी हे सकारात्मक असेल. दिल्लीतील सराफा बाजारात उतरले सोन्याचे दर गुरुवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे गुरुवारी सोन्याचे दर 485 रुपये प्रति तोळा स्वस्त झाल्याने 50,418 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीमध्ये 2081 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. यानंतर चांदी 58,099 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. मोठ्या कालावधीनंतर चांदी 60 हजारांच्या खाली आली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या