Home /News /money /

Gold Price: सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात घसरण, तपासा आजचा लेटेस्ट रेट

Gold Price: सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात घसरण, तपासा आजचा लेटेस्ट रेट

लग्नसराईच्या दिवसांत सोने दरात (Gold Price) मागील तीन दिवसांपासू घसरण सुरू आहे. अशात तुम्ही सोनं खरेदीचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

    नवी दिल्ली, 21 डिसेंबर : लग्नसराईच्या दिवसांत सोने दरात (Gold Price) मागील तीन दिवसांपासू घसरण सुरू आहे. अशात तुम्ही सोनं खरेदीचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज फेब्रुवारी डिलीवरी सोने दरात 0.05 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात (Silver price) 0.8 टक्क्यांची कमी आली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. आज MCX वर फेब्रुवारी सोन्याचा वायदे भाव 48,160 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. मागीलच्या वर्षीच्या तुलनेत सोनं जवळपास 8000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. काय आहे आजचा भाव (Gold Silver Price Today) - फेब्रुवारी डिलीवरी गोल्डचा दर आज 0.17 टक्क्यांच्या घसरणीसह 48,160 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. आज चांदीचा दरही घसरला आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 0.19 टक्क्यांच्या घसरणीसह 61,298 रुपयांवर पोहोचला आहे.

    Aadhaar-Voter ID Link: आधारशी वोटर आयडी कार्ड असं करा लिंक, पाहा सोपी प्रोसेस

    मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर - तुम्हाला जर सोन्या-चांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

    Post Office Monthly Income Scheme: एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा पैसे

    अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता - जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today

    पुढील बातम्या