परदेशी बाजारातील तेजीनंतरही भारतात आज सोनं स्वस्त होण्याची शक्यता, वाचा कारण

परदेशी बाजारातील तेजीनंतरही भारतात आज सोनं स्वस्त होण्याची शक्यता, वाचा कारण

सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये आलेल्या तेजीला बुधवारी रोख लागली आहे. बुधवारी देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव कमी होऊन 51,500 रुपये प्रति तोळाच्याही खाली आले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 सप्टेंबर : अमेरिकेतील चांगल्या आर्थिक आकडेवारीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती (Gold Price Today) थोड्या प्रमाणात तेजी आली आहे. मात्र रुपयाचे मुल्य वधारल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या वाढण्याऱ्या दराला लगाम लागला आहे. बुधवारी एमसीए्क्स एक्सचेंजवर (MCX-Multi Commodity Exchange) ऑक्टोबरसाठीच्या सोन्याची वायदे किंमत 0.35 टक्क्यांनी कमी होऊन 51,320 रुपये प्रति तोळा झाली आहेय चांदी देखील 900 रुपयांनी उतरली आहे. यानंतर चांदीची वायदे किंमत प्रति किलो 70 हजार रुपये झाली आहे. 7 ऑगस्ट रोजी सोन्याचे भाव सर्वोच्च 56,200 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते.

या कारणामुळे भारतात स्वस्त होईल सोने

तज्ज्ञांच्या मते आजच्या सत्रामध्ये आंतरराष्ट्रीय चलनामध्ये चढउतार सुरू असल्यामुळे सोन्या-चांदीच्या दरामध्ये तशीच परिस्थिती राहिल. मॅन्यूफॅक्चरिंग पीएमआयच्या लेटेस्ट आकडेवारीनुसार जगभरात मॅन्यूफॅक्चरिंग अॅक्टिव्हिटीज वाढत आहेत. अशामुळे सोन्याच्या किंमती कमी होऊ शकतात. भारतीय बाजारात आज देखील सोने कमी होण्याची अपेक्षा आहे. कारण रुपयाचे मुल्य आज वधारत आहे.

(हे वाचा-'या' कंपनीची मोठी घोषणा! ग्रामीण भागात 10 हजार लोकांना देणार नोकरी)

कोटक सिक्युरिटीजने त्यांच्या अहवालात असे म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने 1900 डॉलर प्रति औंसवर आहे. परदेशात आज स्पॉट सोन्याची 0.1 टक्क्यांनी वाढून 1,971.07 डॉलर प्रति औंस झाली आहे. अमेरिकेमध्ये सोन्याची वायदे किंमत1,978.90 डॉलरवर स्थीर आहे. तर चांदीचे दर 0.3 टक्क्यांनी वाढून 28.25 डॉलर प्रति औंस झाले आहेत.

मंगळवारी होते असे दर

मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात  99.9 टक्के शुद्धतेच्या अर्थात 24 कॅरेट सोन्याच्या किंमती 52,545 रुपयांवरून वाढून 52,963 रुपये प्रति तोळा झाल्या होत्या. या दरम्यान सोन्याचे दर 418 रुपयांनी वाढले होते. सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीतही तेजी पाहायला मिळाली. मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात चांदीचे दर प्रति किलो 2,246 रुपयांनी वाढले होते. यानंतर चांदी 72,793 रुपये प्रति किलोवर पोहोचली.

First published: September 2, 2020, 3:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading