Home /News /money /

Gold Rate Today: सोन्याच्या दरात आज घसरण, किती स्वस्त झालं सोनं? झटपट चेक करा नवे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात आज घसरण, किती स्वस्त झालं सोनं? झटपट चेक करा नवे दर

Gold Rate Today: सोन्याच्या भावासह चांदीचा भावही 101 रुपये किंवा 0.14 टक्क्यांनी घसरून 69,998 रुपये प्रति किलो झाला आहे. एक दिवसापूर्वीपर्यंत चांदीची विक्री 70 हजारांच्या वर होती.

    मुंबई, 19 एप्रिल : गेल्या काही दिवसात सतत वाढणाऱ्या सोन्याच्या किमती (Gold Price Today) काही आज काहीशा कमी झाल्या आहेत. या आठवड्यात सोन्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव सकाळी 16 रुपयांनी घसरून 53,248 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. ही 3 जून 2022 ची फ्युचर्स किंमत आहे. एक दिवसापूर्वी सोन्याच्या दरात सुमारे 500 रुपयांनी वाढ झाली होती. मात्र, या आठवड्यात सोन्याचे भाव आणखी खाली येण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. सोन्याच्या भावासह चांदीचा भावही (Silver Price Today) 101 रुपये किंवा 0.14 टक्क्यांनी घसरून 69,998 रुपये प्रति किलो झाला आहे. एक दिवसापूर्वीपर्यंत चांदीची विक्री 70 हजारांच्या वर होती. चांदीची ही फ्युचर्स किंमत 5 मे 2022 साठी आहे. एक दिवस आधीपर्यंत, एमसीएक्सवर सोने 53,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 69,499 रुपये प्रति किलो दराने विकली जात होती. जागतिक बाजारात सोने 2,000 डॉलर जवळ पोहोचले जागतिक बाजारातही आज सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. एक दिवस आधी सोन्याचा भाव प्रति औंस 2000 डॉलरच्या जवळ गेला होता. ही दोन वर्षांतील सर्वोच्च पातळी आहे. यावेळी सोन्याचा भाव प्रति औंस 1,998.10 डॉलर होता. मात्र, आज सकाळी सोन्याची स्पॉट किंमत 0.1 टक्क्यांनी घसरून 1,976.46 प्रति औंस झाली. जागतिक बाजारात सोन्याचा भावही 0.3 टक्क्यांनी घसरून 1981 डॉलर प्रति औंस झाला. जागतिक बाजारातही चांदीचा भाव वाढला, मात्र मंगळवारी 0.72 टक्क्यांनी घसरून 25.96 डॉलर प्रति औंसवर विकला गेला. SBI आणि Axis बँकेनंतर 'या' बँकेने व्याजदर वाढवले; ग्राहकांना किती टक्के जास्त व्याज भरावं लागणार? कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

    EPFO मध्ये पगार मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये करण्याचा विचार, लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदा

    मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर  सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold and silver prices today, Gold prices today, Investment, Money

    पुढील बातम्या