मुंबई 20 एप्रिल : जागतिक बाजारातील मंदीमुळे बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. सोने पुन्हा एकदा 53 हजारांवरून खाली येऊन 52 हजारांच्या जवळ आले आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24-कॅरेट शुद्ध सोन्याची फ्युचर्स किंमत बुधवारी सकाळी 0.69 टक्क्यांनी घसरून 52,383 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. सोन्याची फ्युचर्स किंमत मे महिन्याच्या किमतीपासून घेण्यात आली आहे. तसेच चांदीचा भावही 69 हजारांच्या खाली आला. आज चांदीची फ्युचर्स किंमत 0.82 टक्क्यांनी घसरली आहे. सकाळच्या व्यवहारात चांदीचा भाव 68,203 रुपये प्रतिकिलो होता.
डॉलर दबावाखाली
जागतिक बाजारात अमेरिकन डॉलर सध्या दोन वर्षांच्या उच्चांकावर असून, सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंवर दबाव आहे. याचे कारण म्हणजे डॉलरच्या मजबूतीमुळे इतर चलनांच्या गुंतवणूकदारांना सोने खरेदी करणे महाग होत आहे. दुसरीकडे, यूएस ट्रेझरी बाँडचे उत्पन्न 2.9 टक्क्यांपर्यंत वाढले आहे, त्याचाही सोन्याच्या मागणीवर परिणाम होत आहे.
IMF च्या अंदाजाने सोन्याचे दर घसरणे
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) मंगळवारी जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. चालू आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था 3.8 टक्क्यांऐवजी 3.6 टक्क्यांनी वाढेल, असे आयएमएफने म्हटले आहे. यानंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 5 टक्क्यांची घसरण झाली आणि पिवळ्या धातूची मागणीही वाढली. IMF ने महागाई वाढण्याचा अंदाज देखील वर्तवला आहे, ज्यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत घट झाली कारण त्यांची मागणी मंदावली.
रेल्वे तिकीट बुकिंग व्यतिरिक्त IRCTC च्या इतर सुविधांबद्दल माहितीये का? चेक करा डिटेल्स
गेल्या काही सत्रांमध्ये जागतिक बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 2,000 डॉलरपर्यंत पोहोचला होता, परंतु अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि रोखे उत्पन्नात वाढ झाल्यामुळे भावात अचानक घसरण झाली. आजच्या व्यवहारात सोन्याची प्रति औंस 1,950 डॉलरवर विक्री होत होती. अमेरिकन शेअर बाजारातील परतावा यामुळे सोन्यातील गुंतवणूकही कमी होत असून मागणी कमी असल्याने त्याचे भाव खाली येत आहेत. जागतिक बाजारात चांदीची स्पॉट किंमत आज 25.18 डॉलर प्रति औंस आहे.
कशी तपासाल सोन्याची शुद्धता?
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
बँक अकाऊंटमध्ये पैसे नसतील तरी वेळप्रसंगी काढता येतील 10,000 रुपये; काय आहे सरकारची सुविधा?
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.