मराठी बातम्या /बातम्या /मनी /सोन्याचांदीची झळाळी पुन्हा उतरली, वाचा काय आहेत मंगळवारचे भाव

सोन्याचांदीची झळाळी पुन्हा उतरली, वाचा काय आहेत मंगळवारचे भाव

 लॉकडाऊन काळात सोन्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहिला मिळाला. सध्या देशातील काही ठिकाणी दागिन्यांची दुकानं उघडण्यास सुरुवात झाली आहे.

लॉकडाऊन काळात सोन्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहिला मिळाला. सध्या देशातील काही ठिकाणी दागिन्यांची दुकानं उघडण्यास सुरुवात झाली आहे.

लॉकडाऊन काळात सोन्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहिला मिळाला. सध्या देशातील काही ठिकाणी दागिन्यांची दुकानं उघडण्यास सुरुवात झाली आहे.

    नवी दिल्ली, 23 जून : लॉकडाऊन काळात सोन्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहिला मिळाला. सध्या देशातील काही ठिकाणी दागिन्यांची दुकानं उघडण्यास सुरुवात झाली आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी रेकॉर्डस्तरावर सोन्याच्या किंमती पोहोचल्या होत्या. मात्र आज मंगळवारी सोन्याचे दर (Gold Price Today) घसरले आहेत. सोन्यापाठोपाठ चांदी (Silver Price Today) देखील घसरली आहे.

    काय आहेत सोन्या-चांदीचे नवे भाव?

    आज सकाळी 24 कॅरेट सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. सोन्याचे स्पॉट भाव 48,075 रुपये प्रति तोळावर पोहचले आहेत. त्याआधी सकाळी सोन्याचे दर 48300 होते, मात्र 200 रुपयांची घसरण होऊन दर 48,100 वर पोहोचले आहेत. त्यानंतर चांदीच्या किंमतीतही मोठा बदल पाहायला मिळाला आहे. चांदीचे भाव प्रति किलोने 572 रुपयांनी कमी झाले आहे. या घसरणीनंतर चांदी प्रति किलो 48,253 रुपये झाली आहे. सोन्याचांदीचे भाव काहीशा फरकाने विविध शहरांमध्ये वेगळे असू शकतात.

    त्याचप्रमाणे वायदे बाजारात सोन्याच्या किंमतीत काहीसा बदल झाला आहे. एमसीएक्स एक्ससचेंजवर सकाळी 9.30 वाजता ऑगस्ट गोल्ड कॉन्ट्रॅक्ट 0.02 टक्क्याने वाढले होते. परिणामी ऑगस्टसाठीच्या सोन्याचे दर 47,952 प्रति तोळा रुपयांवर ट्रेंड करत होते. तर जुलैसाठी चांदीची किंमत 0.28 टक्क्यांनी कमी झाली आहे. परिणामी चांदीचे दर 48,500 प्रति किलोवर ट्रेंड करत होते.

    सोने खरेदीआधी तपासा हॉलमार्क

    सोन्याचे दागिने खरेदी करताना त्यावरील हॉलमार्क पाहणे गरजेचे आहे. कारण हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांची किंमत तपासणे कठीण असते. त्याचप्रमाणे त्यांची शुद्धता देखील खात्रीने सांगता येणार नाही.

    (हे वाचा-कोरोनाच्या संकटकाळात वर्क फ्रॉम होम पडेल महागात! द्यावा लागणार जास्त Income Tax)

    (हे वाचा-90 दिवसांनतर सुरू होणार आंतरराष्ट्रीय विमानसेवा? नागरी उड्डाण मंत्र्यांचे संकेत)

    संपादन - जान्हवी भाटकर

    First published:

    Tags: Gold and silver prices today, Gold and silver rates today