मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सोन्याची चाळीशी पार, जाणून घ्या कधी होणार स्वस्त

सोन्याची चाळीशी पार, जाणून घ्या कधी होणार स्वस्त

अमेरिका आणि इराणमधील तणाव हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं आणि कच्च तेल महाग होण्यामागचं कारण सांगितलं जात आहे.

अमेरिका आणि इराणमधील तणाव हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं आणि कच्च तेल महाग होण्यामागचं कारण सांगितलं जात आहे.

अमेरिका आणि इराणमधील तणाव हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं आणि कच्च तेल महाग होण्यामागचं कारण सांगितलं जात आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 06 जानेवारी:  लगीन सराईच्यादिवसांमध्ये सोन्याचे दर गगनाला भिडल्यानं सर्वसामान्य ग्राहकांकडून मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त झालं होतं मात्र त्यानंतर सोन्याचे दर पुन्हा वधारल्यानं सराफ बाजारात सोन्याच्या खरेदीमध्ये मोठी घसरण झाली आहे. येत्या काही दिवसांत सोन्याचे दर घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शुक्रवारी कोणीही ग्राहक बाजारात आले नाहीत किंवा ज्वेलर्सनी सराफाकडून कोणतीही खरेदी केली नाही. 15 जानेवारीनंतर सोन्याचे दर कमी होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचं कारण म्हणजे 15 जानेवारीला अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार करारावर स्वाक्षरी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. जर हा करार दोन्ही देशांमध्ये झाला तर सोने स्वस्त होऊ शकते. आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरही त्याचा परिणाम अवलंबून आहे. हा करार झाल्यानंतर सोन्याच्या किंमतीत मोठी घट होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे भाव वाढलेत. न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या किंमती 1 हजार 524 डॉलर प्रतिऔंस झाले तर चांदीचे भाव 18.10 डॉलर प्रतिऔंस झाले. चांदीचे भावही 48 हजार 313 रुपये प्रतिकिलो झाले.

सोन्याचे दर वाढण्यामागचं कारण

सध्या आखाती देश आणि अमेरिकेत असलेला तणाव आणि छुप्या युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे. याशिवाय कच्च्या तेलाच्या आणि सोन्याच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या हल्ल्यानंतर अरबी खाडीमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा सोन्याच्या भावावर आणखी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

हेही वाचा-Rupay कार्डवर 16 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, करावं लागेल हे काम

सोन्याचे भाव चढते राहिले तर याचा फटका सराफांना मोठ्य़ा प्रमाणात बसेल असंही सांगण्यात येत आहे. यामागचं कारण म्हणजे सराफांना सोनं विकण्याचं अथवा सोन्याचे दागिने मोडण्याचं प्रमाण वाढेल. याचं साधं कारण म्हणजे कोणत्याही ग्राहकाला सोन्याची विक्री करायची असेल तर सुमारे 39,900 रुपये रोख किंमत मिळेल. थोडक्या त्या दिवशी सोन्याचा जो दर असेल त्याचे पैसे मिळतील. सोन्याचे दर दहा ग्रॅम 2100 रुपयांनी महाग झाले आहेत. अशा परिस्थितीत बाजारात विक्री चांगली होईल अशी अपेक्षा आहे. जर सोन्याचे असेच वाढत राहिले तर दागदागिने खरेदी करण्याचा विचार करावा लागेल.कारण सोनं सर्वसामान्यांना परवडणारं उरलेलं नाही. त्यामुळे आता 1 ग्रॅम किंवा अमेरिकन डायमंड सारख्या दागिन्यांकडे ग्राहक वळताना दिसत आहेत.

अमेरिका आणि चीनमध्ये व्यापर करार झाला तर सोन्याचा भाव कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. असं झालं तर पुन्हा एकदा सराफांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा-HDFC ने ग्राहकांना दिली नव्या वर्षाची भेट, आता दर महिन्याला होणार बचत

First published:

Tags: 1 Gold, Gold, Gold jewellery, Gold loan, Gold prices, Gold rate