Home /News /money /

Gold Price Today: सोन्याची चमक वाढली, सोनं आजही महागलं; चेक करा नवे दर

Gold Price Today: सोन्याची चमक वाढली, सोनं आजही महागलं; चेक करा नवे दर

शुक्रवारच्या बंद झालेल्या सोन्याच्या किमतीच्या तुलनेत ही सुमारे 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी एमसीएक्सवर सोने 52,549 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते.

    मुंबई, 7 मार्च : सोमवारी सोन्याच्या दरात (Gold Rate Today) जोरदार वाढ झाली. कमोडिटी एक्सचेंज MCX वर सोन्याचा भाव 53,797 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला. शुक्रवारच्या बंद झालेल्या सोन्याच्या किमतीच्या तुलनेत ही सुमारे 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी एमसीएक्सवर सोने 52,549 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. मे 2021 नंतर एका आठवड्यात सोन्यामध्ये झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. स्पॉट मार्केटने 2000 डॉलर प्रति औंस ओलांडला आहे. MCX वर 2022 मध्ये सोन्यामध्ये आतापर्यंत सुमारे 12 टक्के वाढ झाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सोन्याचे भाव वाढण्याचे मुख्य कारण रशिया-युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात सुरू असलेले युद्ध आहे. दोन्ही देशांमधील युद्धाचा आज 12 वा दिवस आहे. आज दोन्ही देशांमध्ये युद्ध संपवण्यासाठी चर्चा होणार आहे. याआधीही दोनदा चर्चा झाली, पण चर्चा निष्फळ ठरली होती. अमेरिकेतील व्याजदरात झालेली वाढ आणि वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ हेही सोन्याच्या दरवाढीचे कारण असल्याचे मानले जात आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध लवकर संपले नाही, तर सोने नवा विक्रम प्रस्थापित करू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची सर्वोच्च किंमत 2,075 डॉलर प्रति औंस होती. येथे, कमोडिटी एक्स्चेंज MCX मध्ये सोन्याची सर्वोच्च किंमत 56,191 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणतात की सोन्याने 2,000 डॉलरची पातळी तोडली आहे. आता ते 2,050 डॉलर प्रति औंसच्या दिशेने जाण्याची अपेक्षा आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव लवकरच 54000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा स्तर ओलांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. जगात जेव्हा जेव्हा राजकीय अस्थिरतेची परिस्थिती निर्माण होते तेव्हा सोन्याच्या किमती वाढतात. कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. घरबसल्या मिस कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याचा दर  सोन्याचा दररोजचा दर हा तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. सोन्याचे भाव जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मोबाईलने 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सोन्याच्या किंमतीबद्दल मेसेज येईल. त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या किंमतीबद्दल सविस्तर माहिती वाचू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold and silver, Gold prices today, Investment, Russia Ukraine

    पुढील बातम्या