• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीत तेजी, खरेदी करण्याआधी इथे तपासा प्रति तोळा सोन्याचा भाव

Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीत तेजी, खरेदी करण्याआधी इथे तपासा प्रति तोळा सोन्याचा भाव

Gold, Silver Price Today: भारतीय सराफा बाजारा सोन्याचे दरात (Gold Price Today) काही दिवसांच्या घसरणीनंतर आज 11 ऑगस्ट रोजी काहीशी तेजी पाहायला मिळाली.

 • Share this:
  नवी दिल्ली, 11 ऑगस्ट: भारतीय सराफा बाजारा सोन्याचे दरात (Gold Price Today) काही दिवसांच्या घसरणीनंतर आज 11 ऑगस्ट रोजी काहीशी तेजी पाहायला मिळाली. या वाढीनंतरही सोन्याचे दर 45 हजार रुपये प्रति तोळाच्या आसपास आहेत. तर चांदीच्या किंमतीत (Silver Price Today) किरकोळ तेजी पाहायला मिळाली. या वाढीनंतर चांदीचे दर 61 हजार रुपये प्रति किलोच्या आसपास आहेत. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 44,971 रुपये प्रति तोळा होते, तर चांदीचे दर 61,250 रुपये प्रति किलो होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत तर चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही. सोन्याचे नवे दर दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर 159 रुपये प्रति तोळाने वाढले आहेत. या वाढीनंतर दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 45,130 रुपये प्रति तोळावर पोहचून बाजार बंद झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर वाढून 1,733 डॉलर प्रति औंस झाले आहेत. हे वाचा-PNB ग्राहकांसाठी मोठी बातमी! 1 सप्टेंबरपासून होणार बचत खात्यावरील व्याजदरात बदल चांदीचे नवे दर चांदीच्या किंमतीत आज उसळी पाहायला मिळाली. बुधवारी चांदीच्या दरात झालेल्या किरकोळा वाढीनंतर दर  61,250 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत. चांदीमध्ये आज केवळ 90 रुपयांची वाढ झाली. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर 23.36 डॉलर प्रति औंस आहेत. हे वाचा-दरमहा EPF मध्ये पैसे जमा होत असतील मिळू शकेल 1.5 कोटींपेक्षा अधिकचा फायदा का वाढले सोन्याचांदीचे दर? एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities) चे सीनियर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, रुपयाच्या तुलनेत डॉलरमध्ये कमजोरी पाहायला मिळाली. परिणामी सोन्याचे दर वाढले आहे. तर न्यूयॉर्क स्थित कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्यामध्ये आलेल्या तेजीचे परिणाम भारतीय बाजारात पाहायला मिळत आहेत.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: