Home /News /money /

Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण सुरूच! आज 10000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं

Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण सुरूच! आज 10000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं

Gold Rates Today

Gold Rates Today

Gold Silver Price, 8 September 2021: सोन्याच्या किंमतीमध्ये बुधवारी देखील घसरण सुरू आहे. याउलट चांदीच्या किंमती आज वाढ झाली आहे.

    नवी दिल्ली, 08 सप्टेंबर: भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today) आजही कमी झाले आहेत. आज 8 सप्टेंबर 2021 रोजी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहेत. तर याउलट चांदीचे दर (Silver Price Today) आज किरकोळ वधारले आहेत. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 46,404 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. तर चांदीचे दर 63,464 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले होते. आज भारतीय बाजारांच्या विरुद्ध परिस्थिती आंतरराष्ट्रीय बाजारात पाहायला मिळाली. सोन्याचे दर ग्लोबल मार्केटमध्ये वाढले आहेत तर चांदीमध्ये विशेष बदल झालेला नाही 10000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे सोनं दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 264 रुपयांनी कमी झाले आहेत. यानंतर राजधानी दिल्लीमध्य 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 46,140 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. याआधारे सोन्याचे दर सर्वोच्च स्तरापेक्षा 10,060 रुपये प्रति तोळाने कमी आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर  56,200 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. त्यामुळे सोन्याचे दर 10 हजारांपेक्षा जास्त फरकाने कमी झाले आहेत. त्यामुळे आता तुमच्याकडे गुंतवणुकीची संधी आहे. कारण तज्ज्ञांच्या मते यावर्षी सोन्याचे दर  60 हजार रुपये प्रति तोळाचा स्तर गाठू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर सोन्याचे दर वाढून 1,798 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. हे वाचा-मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी Good News, मोदी सरकारने वाढवली या रब्बी पिकांची MSP चांदीचे नवे दर चांदीच्या किंमतीत आज सोन्याच्या उलट परिस्थिती पाहायला मिळाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात आज चांदीचे दर 22 रुपये किरकोळ फरकाने वाढले आहेत. यानंतर चांदीचे दर 63,486 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर 24.37 डॉलर प्रति औंसवर आहेत. हे वाचा-कमाईची आणखी एक संधी! 14 सप्टेंबरला येत आहे नवा IPO; किती करावी लागेल गुंतवणूक? का कमी झाले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities) चे सीनिअर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, डॉलरमध्ये मजबुती आल्याने सोन्याचे दर कमी झाले आहेत. यामुळे सोन्याचे दर 1,800 डॉलर प्रति औंसपेक्षा कमी आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आधीच्या घसरणीपेक्षा काहीशी सुधारणा पाहायला मिळते आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात चढउतार सुरूच असल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर कमी आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

    पुढील बातम्या