Home /News /money /

Gold Price Today: सोने महागलं, चांदीही तेजीत; चेक करा एक तोळे सोन्यासाठी नवे दर

Gold Price Today: सोने महागलं, चांदीही तेजीत; चेक करा एक तोळे सोन्यासाठी नवे दर

सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 48,868 रुपये होता. त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याचा भाव 53,310 रुपयांवर उघडला. याशिवाय 20 कॅरेट सोन्याचा सरासरी भाव 44,425 रुपये होता.

    मुंबई, 12 एप्रिल : सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Price) मंगळवारी वाढ झाली. चांदीमध्ये मोठी तेजी नोंदवली गेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 409 रुपयांनी महागले आहे. या तेजीसह आज सकाळी सोने (Gold Rate Today) 52588.00 रुपयांवर व्यवहार करत आहे. आज चांदीच्या दरातही कमालीची वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव 1011.0 रुपयांनी वाढला आहे. चांदी (Silver Rate Today) 68305.00 वर व्यवहार करत आहे.
    कॅरेटनुसार सोन्याची दर
    सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 48,868 रुपये होता. त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याचा भाव 53,310 रुपयांवर उघडला. याशिवाय 20 कॅरेट सोन्याचा सरासरी भाव 44,425 रुपये होता. तर 18 कॅरेटचा भाव 39,983 रुपये आणि 16 कॅरेट सोन्याचा दर 35,540 रुपये झाला. सराफा बाजारात एक किलो चांदीचा भाव 68760 रुपयांवर पोहोचला आहे.`
    कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. बँक अकाऊंटमध्ये पैसे नसतील तरी वेळप्रसंगी काढता येतील 10,000 रुपये; काय आहे सरकारची सुविधा?  मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर  सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्यात काय आहे फरक? 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत फरक असतो. प्रमुख फरक सोन्याच्या शुद्धतेचा असतो. 24 कॅरेट सोनं 99.9 टक्के शुद्ध असतं. तर 22 कॅरेट सोनं 91 टक्के शुद्ध असतं. यात 9 टक्के इतर धातू मिक्स असतात. तर 24 कॅरेट सोन्यात कोणतीही भेसळ नसते. परंतु 99.9 टक्के इतक्या शुद्ध असलेल्या 24 कॅरेट सोन्यापासून कोणतेही दागिने बनवता येत नाहीत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold and silver prices today, Gold prices today, Money

    पुढील बातम्या