मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात महागलं सोनं, वाचा काय आहे आजचा भाव

Gold Price Today: वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात महागलं सोनं, वाचा काय आहे आजचा भाव

जर तुम्ही देखील सोन्याचांदीची खरेदी (Gold Silver Price Today) करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी जाणून घ्या काय आहे आजचा भाव.

जर तुम्ही देखील सोन्याचांदीची खरेदी (Gold Silver Price Today) करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी जाणून घ्या काय आहे आजचा भाव.

जर तुम्ही देखील सोन्याचांदीची खरेदी (Gold Silver Price Today) करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी जाणून घ्या काय आहे आजचा भाव.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 28 डिसेंबर: जर तुम्ही देखील सोन्याचांदीची खरेदी (Gold Silver Price Today) करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी जाणून घ्या काय आहे आजचा भाव. आज सोने आणि चांदी दोन्ही मौल्यवान धातूंचे दर वधारले आहेत. आजच्या वाढीनंतर सोन्याचा दर 48,000 रुपये प्रति तोळाच्या पार गेला आहे. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा (Gold Price Today) 0.15 टक्केने वाढला आहे. तर चांदीचे दर (Silver Price Today) आज 0.23 टक्क्यांनी वाढले आहेत. काय आहे आजचा सोन्याचांदीचा भाव? फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठी आज सोन्याचे दर (Gold Rate on MCX)  0.15 टक्केने वाढले आहेत. यानंतर सोन्याचे दर प्रति तोळा 48,138 रुपये या स्तरावर पोहोचले आहेत. आजच्या दिवशी चांदीचे दर (Silver Rate on MCX) 0.23 टक्क्यांनी वाढून 62,444 रुपये प्रति किलोवर आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 24 कॅरेट सोन्याचा दर
शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
मुंबई48220 रुपये48240 रुपये
पुणे48,940 रुपये48,940 रुपये
नाशिक48,940 रुपये48,940 रुपये
नागपूर48220 रुपये48220 रुपये
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट सोन्याचा दर
शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
मुंबई47220 रुपये47240 रुपये
पुणे46,410 रुपये46,410 रुपये
नाशिक46,410 रुपये46,410 रुपये
नागपूर47220 रुपये47220 रुपये
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये चांदीचा दर
शहरआजचा दर (प्रति किलो)कालचा दर (प्रति किलो)
मुंबई62500 रुपये62300 रुपये
पुणे62500 रुपये62300 रुपये
नाशिक62500 रुपये62300 रुपये
नागपूर62500 रुपये62300 रुपये
हे वाचा-महाराष्ट्रात काय आहेत इंधनाचे दर, एका क्लिकवर वाचा पेट्रोल-डिझेलचा लेटेस्ट भाव सोन्याची शुद्धता कशी तपासायची? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. हे वाचा-नवीन वर्षात होतायंत महत्त्वाचे बदल, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा भाव सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold price, Gold prices today

पुढील बातम्या