• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold Price Today : 47 हजारच्या जवळ पोहचलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ, वाचा लेटेस्‍ट भाव

Gold Price Today : 47 हजारच्या जवळ पोहचलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ, वाचा लेटेस्‍ट भाव

आज म्हणजेच 14 ऑक्टोबर 2021 रोजी सोन्याच्या किमतीमध्ये जोरदार तेजी दिसून आली. सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47 हजार रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या किमतीतही (Gold Silver Price 14 October 2021) मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 14 ऑक्टॉबर : भारतीय सराफा बाजारात आज म्हणजेच 14 ऑक्टोबर 2021 रोजी सोन्याच्या किमतीमध्ये जोरदार तेजी दिसून आली. सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47 हजार रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या किमतीतही (Gold Silver Price 14 October 2021) मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. चांदी 62 हजार रुपये प्रति किलोच्या जवळ पोहोचली आहे. गेल्या व्यापार सत्रादरम्यान दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर 46,532 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. त्याचबरोबर चांदी 61,032 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. भारतीय सराफा बाजारांप्रमाणेच आज आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. तर चांदीच्या किमतीत कोणताही विशेष बदल झालेला नाही. सोन्याची नवे दर दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किमतीत 455 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे राष्ट्रीय राजधानीत 99.9 टक्के ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47 हजार रुपयांच्या जवळ पोहोचली. आज दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत 46,987 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याच्या दरात वाढ नोंदवली गेली आणि ते 1,795 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. हे वाचा - कसं शक्य आहे? शिमला मिरचीच्या आत बिया नव्हे तर चक्क नाणी; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO चांदीची किंमत आज चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली. दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी चांदीचे भाव 894 रुपयांनी वाढून 61,926 रुपये प्रति किलोवर बंद झाले. त्याचवेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या किंमतीत कोणतेही विशेष बदल झाले नाहीत आणि ते 23.20 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. हे वाचा - भारताची नडणं पाकिस्तानला पडलं महागात; एक कप चहासाठी मोजावे लागत आहेत ‘इतके’ रुपये सोन्याचे दर का वाढले? एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, डॉलरची किंमत कमी (Weaker Dollar) होणे आणि यूएस बॉण्डच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे सोन्याचा जास्त किमतीत व्यापार होत आहे. त्याचबरोबर महागाईच्या चिंताजनक वातावरणामुळंही आज सोनं वाढलं. कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या स्पॉट प्राइसमध्ये 0.12 टक्के वाढ झाली आहे. यामुळे सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: