नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती कमी झाल्यामुळे (Gold Price Down) देशांतर्गत बाजारात देखील सोन्याचे दर घसरले आहेत. 4 दिवसांच्या तेजीनंतर शुक्रवारी दिल्लीतील सराफा बाजारात (Gold Spot Price in Delhi) 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर 52500 रुपये प्रति तोळाच्या खाली आले आहेत. तर आज चांदीचे भाव (Silver Rates Today) प्रति किलो 990 रुपयांनी कमी झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काही दिवसात सोन्याच्या किंमतीवरील दबाव वाढू शकतो. कारण टेक्निकल चार्ट्सवर सोने कमजोर होण्याचे चिन्ह दिसत आहे. मात्र तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने 1935 डॉलर प्रति औंस किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
आजचे सोन्याचे भाव (Gold Price on 11th September 2020)
सलग 4 दिवस सोन्याचे भाव वाढते होते. दरम्यान आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे भाव कमी झाले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरलेल्या सोन्याच्या किंमतीचा परिणाम पाहायला मिळाला.
(हे वाचा-याठिकाणी करा FD मध्ये गुंतवणूक, जाणून घ्या 6.95% पर्यंत व्याजदर देणार्या बँका)
याठिकाणी सोन्याचे दर 52,643 रुपये प्रति तोळावरून कमी होत 52,452 रुपये प्रति तोळावर आले आहेत. यावेळी सोन्याच्या दरात 191 रुपये प्रति तोळाची घसरण पाहायला मिळाली आहे.
आजचे चांदीचे भाव (Silver Price on 11th September 2020)
सोन्याबरोबरच आज चांदीही उतरली आहे. शुक्रवारी एक किलोग्रॅम चांदीची किंमत 70,431 रुपयांवरून 69,950 रुपये प्रति किलो झाली आहे. चांदीमध्ये 990 रुपयांची घसरण पाहायला मिळाली.
आता पुढे काय?
गेल्या महिन्यात सोने जवळपास 56,200 रुपये प्रति तोळा या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. अशाप्रकारे चांदी देखील जवळपास 10 हजार रुपयांनी कमी झाली आहे.
(हे वाचा-PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! 8.5 टक्के व्याजाची रक्कम एकरकमी मिळण्याची शक्यता)
कोरोना व्हायरस काळात सोन्याचांदीच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते अमेरिकन डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती उतरल्या आहेत. मात्र सोन्याच्या मागणीत झालेली घसरण अद्यापही सुरूच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver prices today