Home /News /money /

Good News! धनत्रयोदशी दिवशी उतरला सोन्याचा भाव, 8300 रुपयांनी स्वस्त Gold ची करा खरेदी

Good News! धनत्रयोदशी दिवशी उतरला सोन्याचा भाव, 8300 रुपयांनी स्वस्त Gold ची करा खरेदी

Dhanteras 2021: अनेक सराफा दुकानदार आज सोन्याच्या दागिन्यांवर (Gold Rate) विविध सवलती देत आहेत. शिवाय आज सोन्याचांदीच्या (Gold and Silver Price Today) दरात विशेष घसरण पाहायला मिळाली आहे.

    नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर: धनत्रयोदशी दिवशी सोन्याची  (Dhanteras 2021) खरेदी अत्यंत शुभ मानली जाते. तुम्ही देखील आज सोन्याची खरेदी करणार असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अनेक सराफा दुकानदार आज सोन्याच्या दागिन्यांवर (Gold Rate) विविध सवलती देत आहेत. शिवाय आज सोन्याचांदीच्या (Gold and Silver Price Today) दरात विशेष घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर आज डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचा दर (Gold Rate on MCX) 0.14 टक्क्यांनी कमी झाला आहे. तर चांदीचा दर (Silver Price Today) 0.23 टक्क्यांनी कमी झाला आहे. रेकॉर्ड हायपेक्षा 8365 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं 2020 बद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज डिसेंबर फ्युचर गोल्डची एमसीएक्सवर किंमत 47,835 रुपये प्रति तोळाच्या पातळीवर आहे, म्हणजेच आज सोन्याचा दर सुमारे 8,365 रुपयांनी कमी आहे. हे वाचा-Rakesh Jhujhunwala यांच्या पोर्टफोलियोतील 'या' स्टॉकमधून 50% रिटर्नची शक्यता जाणून घ्या काय आहे सोन्या-चांदीची किंमत डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.14 टक्क्यांनी घसरून 47,835 रुपये प्रति तोळा झाला आहे. त्याचवेळी आजच्या व्यवहारात चांदी 0.23 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 64,641 रुपये आहे. धनत्रयोदशी दिवशी जोरदार विक्री आज धनत्रयोदशीच्या दिवशी, देशभरातील सराफा व्यापाऱ्यांनी सुमारे 15 टन सोन्याच्या दागिन्यांचा व्यापार करणे अपेक्षित आहे. अर्थात अंदाजे 7 हजार कोटींचा व्यवसाय होण्याचा अंदाज आहे. CAIT च्या म्हणण्यानुसार, आज दिल्लीतच सोन्या-चांदीचा व्यवसाय 1000 कोटी रुपयांचा होण्याची शक्यता आहे. हे वाचा-सोनंच नव्हे डायमंड-चांदीच्या दागिन्यांवरही सूट, जाणून घ्या कुठे मिळतायंत ऑफर्स मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

    पुढील बातम्या