Home /News /money /

Gold Price: शेअर बाजारातील चढ-उतारादरम्यान सोनं महागलं, चांदीलाही झळाळी; काय आहे आजचा भाव?

Gold Price: शेअर बाजारातील चढ-उतारादरम्यान सोनं महागलं, चांदीलाही झळाळी; काय आहे आजचा भाव?

शेअर बाजारातील (Share Market Latest Update) अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज सोन्याच्या (Gold Price Today on 06th December 2021) किमतीत किंचित वाढ झाली आहे.

    नवी दिल्ली, 06 डिसेंबर: शेअर बाजारातील (Share Market Latest Update) अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज सोन्याच्या (Gold Price Today on 06th December 2021) किमतीत किंचित वाढ झाली आहे. जागतिक ट्रेंडच्या अनुषंगाने सोन्याचे भाव जवळपास स्थिर आहेत. एमसीएक्सवर फ्युचर  गोल्डची किंमत (Gold Rate on MCX) 0.15 टक्क्यांनी वाढून 48,000 रुपये प्रति तोळा झाली आहे. तर चांदीची वायदे किंमत 0.24 टक्क्यांच्या वाढीसह 61,665 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. एका दिवसापूर्वी सोन्याचा भाव 1 टक्का म्हणजेच 550 रुपये प्रति तोळाने वाढला होता, तर चांदी देखील 0.73 टक्क्यांनी वाढली होती. Omicron चा देखील सोन्यावर असा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,783.91 डॉलर प्रति औंसवर स्थिर आहे. जगभरात कोरोनाचा नवा व्हेरिएंट Omicron च्या वाढत्या प्रकरणांमुळे हे दर स्थिर आहेत. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या यूएस एम्प्लॉयमेंट डेटानुसार नोव्हेंबर महिन्यात लक्षणीय घट दिसत आहे, बेरोजगारीचा दर 4.2 टक्क्यांच्या 21 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. डॉलर निर्देशांक 0.1 टक्क्यांनी वाढला आहे, ज्यामुळे इतर चलनांच्या खरेदीदारांसाठी सोन्याची किंमत वाढते. हे वाचा-ख्रिसमसध्ये मिळेल कमाईची संधी, ही मोठी कंपनी आयपीओ आणण्यासाठी सज्ज इतर मौल्यवान धातूंमध्ये स्पॉट सिल्व्हर 0.3 टक्क्यांनी वाढून $22.57 प्रति औंस, तर प्लॅटिनम 0.8 टक्क्यांनी वाढून $939.78 वर पोहोचला. मायगोल्डकार्टचे संचालक विदित गर्ग म्हणाले, रोजगाराच्या आकडेवारीनंतर जॉब मार्केटमध्ये समोर आलेल्या अडचणी आणि नवीन विषाणूच्या प्रसाराच्या भीतीमुळे शुक्रवारी सोन्याचा भाव सुमारे $20 ने मजबूत झाला आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा भाव सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. हे वाचा-टेक्नॉलॉजी फंड्सनी दिलाय जबरदस्त रिटर्न! गुंतवणुकीआधी जाणून घ्या यातील रिस्क सोन्याची शुद्धता कशी तपासायची? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

    पुढील बातम्या