Home /News /money /

Gold Price Today : सोन्याचांदीची चमक पडली फिकी, दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती उतरल्या

Gold Price Today : सोन्याचांदीची चमक पडली फिकी, दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती उतरल्या

Gold and Silver Price Today: सोन्याच्या दरात आज घसरण पाहायला मिळाली आहे. तर सोन्यासह आज चांदी देखील स्वस्त झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचांदीचे भाव आज स्थिर आहेत.

    मुंबई, 04 जानेवारी: सोन्याच्या दरात आज घसरण पाहायला (Gold Price Today on 04th January 2022) मिळाली आहे. तर सोन्यासह आज चांदी देखील (Silver Price Today on 04th January 2022) स्वस्त झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचांदीचे भाव आज स्थिर आहेत. काय आहे आजचा सोन्याचांदीचा दर? दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा दर 597 रुपयांनी कमी होऊन आज किमती 46,814 रुपये प्रति तोळावर पोहोचल्या आहेत. तर आधीच्या सत्रात सोन्याचे दर 47,116 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. आज चांदीच्या दरात 369 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. या घसरणीनंतर चांदीचे दर प्रति किलो 60,625 रुपयांवर आहेत. आधीच्या सत्रात चांदीचे दर 61,222 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत होते. त्यामुळे आज मंगळवारी दोन्ही मौल्यवान धातूंची चमक काहीशी फिकी पडली आहे. हे वाचा-Crypto ATM : जगभरात वाढतेय क्रिप्टो ATM ची संख्या; जाणून घ्या कार्यप्रणाली एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज), तपन पटेल यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,804 डॉलर प्रति औंस वर आणि चांदी 22.83 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होते. कॉमेक्सवर दिसलेल्या घसरणीनंतर देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 2015 नंतरची सर्वात मोठी घसरण 2021 मध्ये, जागतिक बाजारात सोन्याच्या दरात 3.6 टक्क्यांची घसरण झाली आहे, जी 2015 नंतरची सर्वात मोठी वार्षिक घट आहे. महागाईचा सामना करण्यासाठी जगभरातील केंद्रीय बँका कोरोना महामारीच्या काळात सुरू केलेल्या मदतीच्या उपाययोजना हळूहळू मागे घेत आहेत, त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होताना दिसत आहे. हे वाचा-गुंतवणूकदारांचे पैसे सहा दिवसात दुप्पट, 'हे' तीन स्टॉक्स तुमच्याकडे आहे का? अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

    पुढील बातम्या