नवी दिल्ली, 29 सप्टेंबर: बुधवारी एमसीएक्सवर (Gold Price Today On MCX) डिसेंबर फ्युचर गोल्डची किंमत सपाट राहिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किमतीमुळे देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या दरात बदल होतो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर गेल्या7 आठवड्याच्या नीचांकी पातळीकडे पोहोचत आहेत.
आजचा सोन्याचांदीचा भाव
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Rates on Multi commodity exchange) डिसेंबर फ्युचर गोल्डची किंमत 0.13 टक्क्यांनी वाढली आहे. यानंतर सोन्याचा भाव 46, 015 रुपये प्रति तोळावर आहे. तर डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या चांदीची वायदे किंमत (Silver Rate on MCX) 0.17 टक्क्यांनी वाढली आहे. या वाढीनंतर दर 60,568 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.
हे वाचा-1 ऑक्टोबरपासून बदलणार महत्त्वाचे आर्थिक बदल, LPG ते ऑटो डेबिटचे नियम बदलणार
रेकॉर्ड हाय स्तरापेक्षा 10,000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं
पुन्हा सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी निर्माण झाली आहे कारण सोने रेकॉर्ड हाय स्तरापेक्षा 10,185 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. आज MCX वर सोन्याचा दर 46,015 रु. प्रति तोळा आहे. या दराच्या तुलनेत आज सोन्याचा दर 10,185 रुपयांनी कमी आहे.
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर
तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.
हे वाचा-बँक FD वर मिळवा चांगला परतावा, होतील अनेक फायदे
काय आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर (Gold Price in International Market) 1735.17 डॉलर प्रति औंसवर आहेत. मंगळवारी ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याचे दर ऑगस्ट महिन्यापासूनच्या निचांकी पातळीवर होते. मंगळवारी दर 1726.19 डॉलर प्रति औंसवर होते. डॉलर इंडेक्समध्ये वाढ झाल्याने सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. डॉलर इंडेक्स गेल्या दहा महिन्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा जास्त स्तरावर पोहोचला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today