Home /News /money /

Gold Price Today: सोनं-चांदी खरेदीची चांगली संधी, सततच्या वाढीनंतर आज दरात घसरण

Gold Price Today: सोनं-चांदी खरेदीची चांगली संधी, सततच्या वाढीनंतर आज दरात घसरण

मागील काही दिवसांपासून सोने दरात सतत वाढ होत होती. मात्र आज सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरणीची नोंद झाली आहे.

    नवी दिल्ली, 27 जानेवारी : भारतीय सराफा बाजारात मागील काही दिवसांच्या तुलनेत गुरुवारी सोनं-चांदी (Gold-Silver Rates Today) स्वस्त झालं आहे. मागील काही दिवसांपासून सोने दरात सतत वाढ होत होती. मात्र आज सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरणीची नोंद झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचा किंमत आज 48,215 रुपये झाली आहे. तर एक किलो चांदीचा भाव (Silver Price Today) 62,792 रुपये आहे. काय आहे आजचा सोन्याचा भाव - दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोने दरात 563 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली आहे. या घसरणीसह सोन्याचा दर 48,215 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 48,778 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीचा आजचा भाव - दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 1186 रुपयांच्या घसरणीसह 62,792 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 63,978 रुपये प्रति किलोग्रॅम होता.

    हे वाचा - तुमच्या कामाची बातमी! जाणून घ्या कोणत्या Ration Card वर किती मिळतं धान्य

    मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

    हे वाचा - एक लाख रुपये गुंतवून मिळवा 60 लाखांपर्यंतचा नफा, जाणून घ्या चंदनाच्या शेतीची संपूर्ण माहिती

    कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today

    पुढील बातम्या