• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold Price Today: सोन्याचे नवे दर जारी, आजही भाव 47000 रुपयांपेक्षा जास्त

Gold Price Today: सोन्याचे नवे दर जारी, आजही भाव 47000 रुपयांपेक्षा जास्त

Gold Rates Today

Gold Rates Today

तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे दर लवकरच 50000 रुपये प्रति तोळावर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे. सध्या दर तुलनेने कमी असल्याने गुंतवणूकदार यात गुंतवणूक करू शकतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 26 ऑगस्ट: सोन्याचांदीचे दर आज स्थिर आहेत. 26 ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात सोन्याचे दर स्थिर स्तरावर व्यवहार करत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange MCX) 9.30 वाजता ऑक्टोबरच्या डिलिव्हरीचे सोन्याचे दर (Gold Price Today) किरकोळ 0.02 टक्क्यांनी वधारले आहेत. या वाढीनंतर सोन्याचे दर 47,188 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते.  सप्टेंबरच्या चांदीची वायदे किंमत (Silver Price Today) 0.13 टक्क्यांच्या घसरणीनंतर 63,192 रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डची किंमत 0.1 टक्क्यांनी कमी झाले आहेत. यानंतर दर  1,788.17 डॉलर प्रति औंसवर आहेत, अमेरिकन बाजारात वायदे किंमत  1,789.80 डॉलर आहे. देशातील महत्त्वाच्या शहरातील सोन्याचे दर (Gold Price Today)  गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, गुरुवारी 22 कॅरेट सोन्याचे दर 160 रुपयांनी कमी होऊन 46,490 रुपये प्रति तोळा झाले आहेत. दिल्ली आणि मुंबईत अनुक्रमे किंमत 46,500 रुपये आणि 46,490 प्रति तोळा आहे. तर चेन्नईमध्ये सोन्याचा दर 44,740 रुपये प्रति तोळा आहे. 24 कॅरेट सोन्याचे दरही 160 रुपयांनी कमी झाले असून 47,490 रुपये प्रति तोळा आहेत. या शुद्धतेच्या सोन्याचे दर मुंबईत 47,490 रुपये तर दिल्लीत 50,700 रुपये प्रति तोळा आहेत. हे वाचा-मारुती कार घेण्यासाठी करावा लागला होता खटाटोप, Tarun Bajaj यांनी सांगितला किस्सा सोन्याचे दर गाठणार 50000 चा टप्पा तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे दर लवकरच 50000 रुपये प्रति तोळावर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे. सध्या दर तुलनेने कमी असल्याने गुंतवणूकदार यात गुंतवणूक करू शकतात. आधीपासून सोन्यात गुंतवणूक करत असाल तर आता देखील होल्ड ठेवणं फायदेशीर ठरू शकेल. अशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता? जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. हे वाचा-केंद्र सरकारच्या 'या' मोठ्या निर्णयामुळे देशातील लाखो तरुणांना मिळू शकतो रोजगार या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: