Home /News /money /

Gold Price Today: आज पुन्हा सोन्याच्या दरात जोरदार तेजी, 48000 रुपयांपार गोल्ड रेट

Gold Price Today: आज पुन्हा सोन्याच्या दरात जोरदार तेजी, 48000 रुपयांपार गोल्ड रेट

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Rate on MCX) आज सोन्याचांदीचे दर तेजीसह ट्रेड करत आहेत. एमसीएक्सवर फेब्रुवारीच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर (Gold Price) 0.20 टक्क्यांनी वाढले आहेत तर चांदीचे दर 0.41 टक्क्यांनी वाढले आहेत.

    नवी दिल्ली, 23 डिसेंबर: मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Rate on MCX) आज सोन्याचांदीचे दर तेजीसह ट्रेड करत आहेत. एमसीएक्सवर फेब्रुवारीच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर (Gold Price) 0.20 टक्क्यांनी वाढले आहेत तर चांदीचे दर 0.41 टक्क्यांनी वाढले आहेत. आजच्या वाढीनंतर सोन्याचे दर 48 हजार रुपयांपार गेले आहेत. 50,000 रुपयांपार जाऊ शकतो सोन्याचा दर सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. लग्नाच्या मोसमात सोन्याच्या मागणीत वाढ होत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लग्नसराईचा मोसम पुन्हा चमकत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोन्याचे भाव 50 हजार रुपये प्रति तोळाच्या घरात पोहोचल्याचे पाहायला मिळू शकेल. जाणून घ्या सोन्याची किंमत (Gold Price Today) सोन्याच्या दरात आज मोठी तेजी आली आहे. फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.20 टक्क्यांच्या वाढीसह 48,293 रुपये प्रति तोळावर ​​व्यवहार करत आहे. हे वाचा-अवघ्या 50000 रुपयांमध्ये सुरू करा हा व्यवसाय, होईल 5 लाखांपर्यंतची कमाई चांदीची आजची किंमत (Silver Price Today) आज सराफा बाजारात चांदीचा भाव वाढला आहे. आज चांदीचा भाव 0.41 टक्क्यांनी वाढून 62,440 रुपये किलो झाला आहे. सोन्याची शुद्धता कशी तपासायची? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. हे वाचा-नवीन वर्षात होतायंत महत्त्वाचे बदल, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा भाव सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

    पुढील बातम्या