मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: सोने दरात पुन्हा तेजी, तर चांदीचा भाव घसरला, पाहा 10 ग्रॅमचा गोल्ड रेट

Gold Price Today: सोने दरात पुन्हा तेजी, तर चांदीचा भाव घसरला, पाहा 10 ग्रॅमचा गोल्ड रेट

गेल्या वर्षीच्या तुलनेत रेकॉर्ड लेवलवरुन सोन्याचा दर कमी आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोने दर येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 19 मे: भारतीय बाजारात आज सोने दरात तेजी नोंदवण्यात आली आहे. तर चांदीचे भाव काहीसे कमी झाले आहेत. एमसीएक्सवर आज गोल्ड 0.04 टक्के तेजीसह 48,324 प्रति 10 ग्रॅमवर आहे. तर चांदी 0.61 टक्क्यांनी घसरुन 72,749 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत रेकॉर्ड लेवलवरुन सोन्याचा दर कमी आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोने दर येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा दर 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला होता. आता येत्या लग्नसमारंभाच्या काळात पुन्हा एकदा सोन्याचा दर 52,000 प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचू शकतो.

सोन्याचे दर (Gold Price) -

बुधवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर जून वायदा सोने दर 0.04 टक्क्यांनी वाढून 48,324 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.

चांदीचा भाव (Silver Price) -

एमसीएक्सवर मे वायदा चांदीचा दर 0.61 टक्क्यांनी कमी होऊन 72,749 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे.

(वाचा - सरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा)

अशी तपासा सोन्याची शुद्धता -

सोन्याची शुद्धता चेक करण्यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' वरुन ग्राहक (Consumer) सोन्याची (Gold) शुद्धता (Purity) तपासू शकतात. या अॅपद्वारे (App) केवळ सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करता येऊ शकते.

(वाचा - घरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी)

या अॅपमध्ये वस्तूचं लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास, ग्राहक याची तक्रार त्वरित या अॅपद्वारे करू शकतात. तसंच तक्रार दाखल केल्यानंतर ग्राहकाला तक्रार दाखल केल्याची माहितीही मिळेल.

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today, Money