नवी दिल्ली, 17 जून : जागतिक दराच्या घसरणीनंतर आज भारतीय बाजारपेठेत (Gold Market) सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये (Gold Price Today) मोठी घसरण दिसून आली. एमसीएक्सवरील सोन्याचे वायदे साधारणपणे 2 टक्क्यांनी घसरले आणि त्यामुळं सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,420 रुपयांवर आली. तर चांदीच्या दरातही 2 टक्क्यांनी घसरण होऊन दर 70,023 वर खाली आला.
कॉमेक्सवरील सोनं 6 आठवड्यांच्या नीचांकी आहे. यूएस फेडरल रिझर्वच्या हॉकिश कमेंटने किंमतींवर दबाव आणला आहे. फेडने 2023 मध्ये दर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की तांत्रिकदृष्ट्या एमसीएक्सचे सोने 47,700 ते 47,900 रुपयांपर्यंत राहू शकते. त्याच वेळी, चांदीचा दर 71,300 च्या जवळपास राहू शकतो.
2023 मध्ये दोनदा दर वाढवण्याची शक्यता
यूएस-फेडने सध्या व्याज दर बदललेले नाहीत. मात्र, दुसरीकडं मालमत्ता खरेदी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फेडने वर्ष 2023 मध्ये दोनदा दर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. फेडने अमेरिकन अर्थव्यवस्थेत वेगात रिकवरी होण्याची आशा व्यक्त केली आहे आणि अमेरिकेच्या जीडीपी वाढीचा दर 7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर महागाई दर 4.4 टक्के राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
आशियाई व्यापारात आज सोन्याच्या किंमतींनी त्यांचे नुकसान मागील दिवसाच्या तुलनेत कमी राखण्यात यश मिळवल्याचे दिसून आले. कारण गुंतवणूकदारांनी दरात होत असलेल्या तीव्र घसरणीचा फायदा घेतला. स्पॉट गोल्ड 0.6% वधारला आणि 1,822.36 डॉलर प्रति औंस झाला. अन्य मौल्यवान धातूंमध्ये चांदी 0.5% वाढून 27.09 डॉलर प्रति औंसवर, पॅलेडियम 1% घसरून 2,770.49 डॉलर, तर प्लॅटिनम 0.5% वाढून 1,127.49 डॉलर झाला.
हे वाचा -
नागपुरात अफगाणी नागरिकाला अटक, तालिबानी अतिरेक्यांना सोशल मीडियावर करत होता फॉलो
एमसीएक्सवर सोन्याची किंमत 48,000 रुपयांच्या खाली गेली आहे. एमसीएक्सवर सोन्याचे दर हे 1 महिन्यांमधील सर्वात खालच्या पातळीवर आले आहेत. त्याच वेळी, कॉमेक्स वर सोने दीड महिन्यांच्या नीचांकी आहे. फेडरल रिझर्व्हच्या हॉकिश कमेंटने त्यावर दबाव आणला आहे. अमेरिकन बाँडच्या उत्पन्नातही वाढ झाली असून ते 1.58 टक्क्यांच्या जवळपास आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.