Home /News /money /

Gold Price Today: आज काय दराने खरेदी कराल सोनंचांदी? मौल्यवान धातूंच्या दरात उसळी

Gold Price Today: आज काय दराने खरेदी कराल सोनंचांदी? मौल्यवान धातूंच्या दरात उसळी

Gold-Silver Price Today 14 January 2022: दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 93 रुपये प्रति तोळाने वाढले आहेत. यानंतर आज सोनं 47005 रुपये प्रति तोळावर पोहोचलं आहे

  मुंबई, 14 जानेवारी: भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत (Gold-Silver Price Today) वाढ झाली आहे. आज 14 जानेवारी 2022 रोजी (Gold Rate on 14th January 2022) सोने महाग झाले आहे. यासह चांदीची चमकही (Silver Rate on 14th January 2022) वाढली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात आज सोन्याचा भाव 93 रुपयांनी वाढला आहे. त्याचवेळी आज चांदीच्या दरात 59 रुपयांची उसळी नोंदवण्यात आली. राज्यातील सोन्याच्या दरातही किरकोळ बदल झाला आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटवरील माहितीनुसार, मुंबईत सोन्याचे दर 120 रुपयांनी कमी झाले आहेत तर पुण्यात दर वधारले आहेत. तर चांदीचे दर 200 रुपयांनी वाढले आहेत. आज सोन्याचा भाव किती आहे? दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति तोळा 93 रुपयांनी वाढून 47,005 रुपये प्रति तोळावर ​​बंद झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात  सोने 46,912 रुपये प्रति तोळावर ​​बंद झाले होते. आज चांदीची किंमत किती आहे? दिल्लीतील सराफा बाजारात चांदीचा भाव 59 रुपयांनी वाढून 61,005 रुपये प्रति किलोवर बंद झाला. गेल्या व्यापार सत्रात चांदीचा भाव 60,946 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. हे वाचा-Paytm Share:1,000रुपयांच्या खाली घसरल्यानंतर पेटीएमचे शेअर्स 2.9टक्क्यांनी वाढले महाराष्ट्रातील 24 कॅरेट सोन्याचा दर
  शहर आजचा दर (प्रति तोळा) कालचा दर (प्रति तोळा)
  मुंबई 48980 रुपये 49100 रुपये
  पुणे 49030 रुपये 48840 रुपये
  नाशिक 49030 रुपये 48840 रुपये
  नागपूर 48980 रुपये 49100 रुपये
  महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट सोन्याचा दर
  शहर आजचा दर (प्रति तोळा) कालचा दर (प्रति तोळा)
  मुंबई 46980 रुपये 47100 रुपये
  पुणे 46510 रुपये 46330 रुपये
  नाशिक 46510 रुपये 46330 रुपये
  नागपूर 46980 रुपये 47100 रुपये
  महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये चांदीचा दर
  शहर आजचा दर (प्रति किलो) कालचा दर (प्रति किलो)
  मुंबई 62200 रुपये 62000 रुपये
  पुणे 62200 रुपये 62000 रुपये
  नाशिक 62200 रुपये 62000 रुपये
  नागपूर 62200 रुपये 62000 रुपये
  मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. हे वाचा-पतीच्या मृत्यूचा धक्का अन् 7000 कोटींचं कर्ज; मालविकांनी CCD ला आणले अच्छे दिन! कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today

  पुढील बातम्या