Home /News /money /

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या का आहे ही सोनेखरेदीची योग्य वेळ

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या का आहे ही सोनेखरेदीची योग्य वेळ

Gold Rates Today: सध्या तुम्ही सोनेखरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कारण सोन्याचे दर पुन्हा एकदा कमी होत आहे. जाणून घ्या आजचा भाव

    नवी दिल्ली, 10 एप्रिल: लग्नसराईचा काळ सुरू झाला की पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढण्यास सुरुवात होईल. अशावेळी तुम्हाला सोनेखरेदी करायची असेल तर ही सुवर्णसंधी आहे. कारण आता पुन्हा एकदा सोन्याच्या किंमती उतरण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर  (Multi commodity exchange) सोन्याचे दर (Gold Price Today) उतरल्याचे पाहायला मिळालं होतं. तर चांदीची किंमत (Silver Price Today) कमी झाली होती. 10000 रुपयांपर्यंत उतरले आहेत सोन्याचे भाव एमसीएक्सवर सोन्याचे दर 0.1 टक्क्याने घसरून 46,793 प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीचे दर 0.4 टक्क्याने घसरून 67,240 प्रति किलो झाले आहेत. आधीच्या दोन सत्रामध्ये सोन्याचे दर प्रति तोळा 1000 रुपयांनी वाढले होते. गेल्या वर्षीऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर होते. यावेळी सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळा झाले होते. आता या रेकॉर्ड स्तरापासून सोन्याचे दर जवळपास 10000 रुपयांनी कमी झाले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचे दर प्रति तोळा 182 रुपयांनी वाढले होते. (हे वाचा-Alert! तुमचं डेबिट-क्रेडिट कार्ड सुरक्षित आहे का? 3.3 कोटी Card Data चा डार्क वे) एप्रिलमध्ये पुन्हा वाढू लागले आहेत सोन्याचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत सोन्याचे दर कमी झाले असले तरी या महिन्यात सोन्याच्या दरात वाढ जास्त प्रमाणात दिसून येते आहे. PTI च्या वृत्तानुसार 1 एप्रिल रोजी दिल्लीत सोन्याची स्पॉट प्राइज 44,701 रुपये प्रति तोळा होती, 5 एप्रिल रोजी ही किंमत 44,949 रुपये प्रति तोळा झाली तर 8 एप्रिल रोजी त्यात आणखी वाढ होऊन  दर 46160 रुपये प्रति तोळा झाले आहेत. अशावेळी सोने खरेदी करण्याची हिच योग्य वेळ ठरेल असं तज्ज्ञांचं मत आहे. कारण भविष्यात यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. (हे वाचा-फक्त एकदा पैसे भरा आणि आयुष्यभर दरमहा 8000 रुपये मिळवा; LIC ची खास पॉलिसी) गुंतवणुकीसाठी योग्य वेळ सोन्यामध्ये गुंतवणुकीची ही योग्य वेळ आहे. कारण सोन्याची किंमत वाढल्यानंतर तुम्हाला चांगला रिटर्न मिळवता येईल. सध्या सोन्याचे दर 46 हजारच्या आसपास आहेत. मात्र एप्रिल अखेरीस हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर मे महिन्यात अक्षय तृतीयेचा सण असल्याने त्यावेळी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. त्यामुळे आता सोनेखरेदी केलेल्या गुंतवणुकदारांना पुढील महिन्यात चांगला रिटर्न मिळवण्याची संधी मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today

    पुढील बातम्या