• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Gold Price Today: दिवाळीत सोनं खरेदी करावी का? तपासा आजचा गोल्ड रेट

Gold Price Today: दिवाळीत सोनं खरेदी करावी का? तपासा आजचा गोल्ड रेट

मल्टी कमॉडिटी एक्सचेंज MCX वर आज मंगळवारी सोनं डिसेंबर वायदे बाजारानुसार 47,675 वर ट्रेड करत आहे. तर चांदी काहीशा घसरणीसह ट्रेड करत आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : दिवाळीत धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. जर तुम्हीही धनत्रयोदशीला सोनं खरेदीचा विचार करत असाल, तर सोनं गुंतवणुकीसाठी चांगली संधी आहे. गुंतवणुकदारांना गोल्डने एका महिन्यात चांगले रिटर्न्स दिले आहेत. एका महिन्यात एका तोळ्यावर 1200 रुपयांहून अधिक रिटर्न मिळाले आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज MCX वर आज मंगळवारी सोनं डिसेंबर वायदे बाजारानुसार 47,675 वर ट्रेड करत आहे. तर चांदी काहीशा घसरणीसह ट्रेड करत आहे. MCX वर 3 डिसेंबरसाठी चांदी 64,425 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे. दिल्ली-मुंबईत काय आहे रेट (Gold Rate in Delhi-Mumbai) - दिल्ली सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा दर 4685 रुपये प्रति ग्रॅम ट्रेड करत आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 4,674 रुपये प्रति ग्रॅम होता. जर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर 47,440 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. मागील एका महिन्यातील चढ-उतार पाहता 1 ऑक्टोबरला 22 कॅरेट सोन्याचा दर 45,470 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर आज एक महिन्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी 46,740 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गुड रिटर्न्सनुसार, सोमवारी भारतात 22 कॅरेट सोन्याच्या किंमती 4,699 रुपये आहेत. तर 8 ग्रॅम सोन्याचा भाव 37,592 रुपयांच्या जवळपास आहे. रविवारी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,990 रुपये होता.

    दिवाळीआधी महागाईचा जोरजार झटका, LPG Gas Cylinder च्या दरात वाढ

    सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

    Petrol- Diesel price today: आज महिन्याच्या सुरुवातीलाच पेट्रोल-डिझेल महागलं, पाहा किती झाली वाढ

    अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता - सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.
    Published by:Karishma
    First published: