Gold Price Today: लग्नसराईच्या दिवसात सोने-चांदी दरात चढ-उतार; पाहा काय आहे गोल्ड रेट

लग्नसमारंभाचा सीजन सुरू होताच सोने-चांदी दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सोने व्यापाराच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा दर काहीशा घसरणीसह बंद झाला.

लग्नसमारंभाचा सीजन सुरू होताच सोने-चांदी दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सोने व्यापाराच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा दर काहीशा घसरणीसह बंद झाला.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 एप्रिल : लग्नसमारंभाचा सीजन सुरू होताच सोने-चांदी (Gold Silver Rate Today) दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सोने व्यापाराच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा दर काहीशा घसरणीसह बंद झाला. सोन्याचा जून वायदे भाव 212.00 रुपयांच्या घसरणीसह 47,540 रुपयांवर बंद झाला. तर चांदीचा मे महिन्यातील फ्यूचर ट्रेड 508.00 रुपयांच्या घसरणीसह 68,710 रुपयांवर बंद झाला. बिजनेस वेबसाईट गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, काय आहे भारतातील चार मोठ्या शहरातील सोने-चांदी दर - दिल्ली - 22 कॅरेट गोल्ड - 46350 रुपये प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट गोल्ड - 50570 रुपये प्रति 10 ग्रॅम चांदीचा भाव - 68700 रुपये प्रति किलो मुंबई - 22 कॅरेट गोल्ड - 45, 050 रुपये प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट गोल्ड - 46,050 रुपये प्रति 10 ग्रॅम चांदीचा दर - 68700 रुपये प्रति किलो

  (वाचा - Corona च्या संकटकाळात इथे करा गुंतवणूक, केवळ 500 रुपयांत सुरुवात करून मिळवा नफा)

  चेन्नई - 22 कॅरेट गोल्ड - 44,940 रुपये प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट गोल्ड - 49,030 रुपये प्रति 10 ग्रॅम चांदी प्रति किलो 68700 रुपये कोलकाता - 22 कॅरेट गोल्ड - 47,540 रुपये प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट गोल्ड - 49,810 रुपये प्रति 10 ग्रॅम चांदी - 68700 रुपये प्रति किलो अशी तपासा सोन्याची शुद्धता - सोन्याची शुद्धता (Gold Purity)  तपासायची असल्यास, सरकारकडून एक App बनवण्यात आलं आहे. 'BIS Care app' वरुन ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे केवळ सोन्याची शुद्धताच तपासली जात नाही, तर ग्राहक यासंबंधी कोणतीही तक्रार दाखल करू शकतात. या अ‍ॅपमध्ये जर सामानाचं लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास, ग्राहक याची तक्रार करू शकतात. तसंच तक्रार दाखल केल्यानंतर ग्राहकाला याबाबत संपूर्ण माहितीही मिळते.
  Published by:Karishma Bhurke
  First published: