मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold-Silver Price Today: सोन्याच्या दरात तेजी तर चांदीची झळाळी उतरली, किती महागलं सोनं?

Gold-Silver Price Today: सोन्याच्या दरात तेजी तर चांदीची झळाळी उतरली, किती महागलं सोनं?

आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याच्या दरात (Gold Rate today) पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर वधारले असले तरी आज चांदीच्या दरात (Silver Rate Today) काहीशी घसरण झाली आहे.

आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याच्या दरात (Gold Rate today) पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर वधारले असले तरी आज चांदीच्या दरात (Silver Rate Today) काहीशी घसरण झाली आहे.

आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याच्या दरात (Gold Rate today) पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर वधारले असले तरी आज चांदीच्या दरात (Silver Rate Today) काहीशी घसरण झाली आहे.

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याच्या दरात (Gold Rate today) पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर वधारले (Gold Price Today) असले तरी आज चांदीच्या दरात (Silver Rate Today) काहीशी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठी सोन्याच्या किमती (Silver Price Today) आज 0.61 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचवेळी चांदीचे भाव 0.05 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.

लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. अशा स्थितीत सोन्या-चांदीची मागणी वाढल्याने किमतींना आधार मिळतो आहे. त्यामुळे तसं पाहिलं तर सोन्याचे दर हळूहळू 50,000 रुपये प्रति तोळाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

जाणून घ्या काय आहे सोन्या-चांदीचा भाव

डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.61 टक्क्यांनी वाढून 47,710 रुपये प्रति तोळा झाला आहे. आजच्या व्यवहारात चांदी 0.05 टक्क्यांनी घसरली आहे, आज 1 किलो चांदीचा भाव 63,117 रुपये आहे.

हे वाचा-Savings Vs Current | सेव्हिंग अकाउंट की करंट अकाउंट तुमच्या फायद्याचं कोणतं?

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा भाव

सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

हे वाचा-PNB Mega E-auction: स्वस्तात खरेदी करा घर! ही बँक आज देतेय संधी; वाचा सविस्तर

सोन्याची शुद्धता कशी तपासायची?

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today