मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात वाढ, काय आहेत आजचे नवे दर?

Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात वाढ, काय आहेत आजचे नवे दर?

आज सकाळी राठोड नेहमीप्रमाणे स्कुटीच्या डिकीत सोन्याचे दागिने घेऊन दुकानाकडे आले.

आज सकाळी राठोड नेहमीप्रमाणे स्कुटीच्या डिकीत सोन्याचे दागिने घेऊन दुकानाकडे आले.

ऑगस्ट 2020 मध्ये सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 55,400 रुपये होती. आजच्या किमतीची सोन्याच्या सर्वकालीन उच्चांकाशी तुलना केल्यास, सोने त्याच्या विक्रमी किमतीपासून 7,040 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 16 डिसेंबर : लग्नसराईचे दिवस आहेत त्यामुळे अनेकांची नजर सोन्याच्या भावाकडे लागलेली आहे. सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसात चढ उतार होताना दिसत आहे. मात्र अजूनही सोनं विक्रमी उचांकापासून बरंच स्वस्त मिळत आहे. आज मल्टी-कमोडिटी एक्स्चेंजवर (multi-commodity exchange) गुरुवारी सोन्या-चांदीच्या किमतीत 0.57 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. आज सकाळी 9.33 वाजता, सोन्याचा भाव (Gold Rate Today 16 December) 48,360 रुपये प्रति 10 ग्रॅम वर ट्रेड करत होता. याशिवाय आज चांदीच्या किमती (Silver rate today 16 December) देखील मोठी वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत आज MCX वर चांदीची किंमत 2 टक्क्यांनी वाढून 61,414 रुपये झाली आहे.

सोनं विक्रमी किमतीपेक्षा 7040 स्वस्त

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या किमतीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. ऑगस्ट 2020 मध्ये सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 55,400 रुपये होती. आजच्या किमतीची सोन्याच्या सर्वकालीन उच्चांकाशी तुलना केल्यास, सोने त्याच्या विक्रमी किमतीपासून 7,040 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे.

Investment Tips: या 10 शेअर्सने 5 वर्षात 10 लाख रुपयांचे केले 1.7 कोटी रुपये, पाहा कोणते आहे हे स्टॉक्स

24 आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव

आज दिल्लीत 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 51,430 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,150 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. Goodreturns च्या अहवालानुसार, आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 47,910 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. त्याच वेळी, 22 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव मुंबईत 46,910 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​गेला आहे.

सोन्याचा नवा भाव कसा पाहायचा? (How to check gold price)

सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

22रुपयांचा हा शेअर एका वर्षात झाला 354रुपये,1 लाखाचे झाले 16 लाखांहून अधिक रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासायची?

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

First published:

Tags: Gold, Gold and silver prices today