• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत उसळी, तरी देखील 10000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं; वाचा काय आहे दर

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत उसळी, तरी देखील 10000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं; वाचा काय आहे दर

Gold Rate Today

Gold Rate Today

भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today) 22 सप्टेंबर 2021 रोजी वधारले आहेत. असे असले तरीही रेकॉर्ड हायपेक्षा सोन्याचे दर 10 हजारांपेक्षा अधिक दराने स्वस्त आहेत. तर चांदीच्या दरातही (Silver Price Today) आज तेजी पाहायला मिळाली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 सप्टेंबर: भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today) 22 सप्टेंबर 2021 रोजी वधारले आहेत. तर चांदीच्या दरातही (Silver Price Today)  आज तेजी पाहायला मिळाली आहे. आधीच्या व्यवहाराच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Rates Today) 45,550 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. तर चांदीचे दर (Silver Rates Today) 59,289 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील आज सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. मात्र चांदीच्या किंमतीत विशेष बदल झालेला नाही. सोन्याचे नवे दर दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात 196 रुपये प्रति रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 45,746 रुपये प्रति तोळावर पोहोचल्यावर बाजार बंद झाला आहे. यानंतर देखील सोन्याचे दर रेकॉर्ड हायपेक्षा 10,454 रुपये प्रति तोळाने स्वस्त मिळत आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. त्या तुलनेत सोन्याचे दर 10,454 रुपयांनी स्वस्त आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर वाढून 1,776 डॉलर प्रति औंस या स्तरावर आहेत. हे वाचा-Alert! अँड्रॉइड वापरणाऱ्या बँक खातेधारकांनी राहा सावध, अन्यथा खातं होईल रिकामं चांदीचे नवे दर चांदीच्या किंमतीत देखील आज उसळी पाहायला मिळाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी चांदीच्या दरात 319 रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे. या वाढीनंतर चांदीचे दर 59,608 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही. याठिकाणी चांदीचे दर 22.72 डॉलर प्रति औंस आहेत. हे वाचा-उशीरा आयटीआर भरला तर द्यावा लागणार भरभक्कम दंड, या करदात्यांना मिळणार सूट सोन्यामध्ये का आली तेजी? एचडीएफसी सिक्‍योरिटीजचे सीनिअर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेडरल ओपन मार्केट कमेटीच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तसंच चीनमधील एव्हरग्रांडे संकट या कारणांमुळे सोन्याच्या खरेदीला प्राधान्य देण्यात आलं आहे. तसंच फॉरेक्स मार्केटमध्ये आज सकाळी रुपया डॉलरच्या तुलनेत 26 पैशांच्या घसरणीसह 73.87 च्या पातळीवर व्यवहार करत होता. यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: