Home /News /money /

Gold Price Today: 510 रुपयांनी महागलं सोनं, चांदीलाही झळाळी; आज हा आहे एक तोळा सोन्याचा भाव

Gold Price Today: 510 रुपयांनी महागलं सोनं, चांदीलाही झळाळी; आज हा आहे एक तोळा सोन्याचा भाव

सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Price Today) शनिवारी काही प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. गुड रिटर्न वेबसाइटच्या मते आज सोन्याचे दर प्रति 100 ग्रॅम 5,100 रुपये दराने वाढले आहेत.

    नवी दिल्ली, 08 मे: सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Price Today) शनिवारी काही प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. गुड रिटर्न वेबसाइटच्या मते आज सोन्याचे दर (Gold Rates) प्रति 100 ग्रॅम 5,100 रुपये दराने वाढले आहेत. अर्थात सोन्याचे दर प्रति तोळा 510 रुपयांनी वाढले आहेत. या वाढीनंतर देशांतर्गत बाजारात भारतात 22 कॅरेट सोन्याचे दर 44,900 रुपये प्रति तोळा, 24 कॅरेट सोन्याचे दर 45,900 रुपये प्रति तोळा झाले आहेत. आज चांदीच्या दरातही (Silver Price Today) वाढ झाली आहे. या वेबसाइटच्या मते शुक्रवारी सोन्याचे दर 44,290 रुपये प्रति तोळा होते. सोन्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून किरकोळ वाढ पाहायवा मिळत आहे. असे असले तरीही गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर (Gold Record High Rates) सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. त्या स्तरापेक्षा आजपर्यंत साधारण 9000 रुपयांनी सोन्याचे भाव कमी आहेत. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार महानगरातील 22 कॅरेट सोन्याचे दर दिल्लीमध्ये 45,990 रुपये प्रति तोळा मुंबईमध्ये 44,900 रुपये प्रति तोळा चेन्नईमध्ये 45,100 रुपये प्रति तोळा कोलकातामध्ये दर 45,990 रुपये प्रति तोळा हे वाचा-Post Office योजनांमध्ये आहे गुंतवणूक? वाचा या सेवांसाठी किती द्यावे लागेल शुल्क 24 कॅरेट सोन्याचे दर दिल्लीमध्ये 49,990 रुपये प्रति तोळा मुंबईमध्ये 45,900 रुपये प्रति तोळा चेन्नईमध्ये 49,200 रुपये तोळा कोलकातामध्ये दर 49,650 रुपये प्रति तोळा हे वाचा-सोन्याच्या खरेदी-विक्रीबाबतचा हा नियम बदलणार, तुमच्या दागिन्यांवर होणार परिणाम? चांदीची आजची किंमत दिल्लीमध्ये 71,500 रुपये प्रति 1 किलोग्रॅम मुंबईमध्ये 71,500 रुपये प्रति 1 किलोग्रॅम चेन्नईमध्ये 76,100 रुपये प्रति 1 किलोग्रॅम कोलकातामध्ये 71,500 रुपये प्रति 1 किलोग्रॅम कशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता? जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price

    पुढील बातम्या