मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: सोने-चांदी दरातील घसरण सुरूच; जाणून घ्या आजचा भाव

Gold Price Today: सोने-चांदी दरातील घसरण सुरूच; जाणून घ्या आजचा भाव

सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशाने वधारला आहे. सोन्या-चांदीच्या आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती कमी झाल्याने, भारतीय बाजारातही त्याचा परिणाम झाला आहे.

  नवी दिल्ली, 14 डिसेंबर : गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. भारतीय बाजारात सोमवारीही सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात 14 डिसेंबर 2020 रोजी सोन्याच्या दरात (Gold Price Today) 460 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. तर चांदीचे दरही घसरले आहेत. एक किलोग्रॅम चांदीच्या दरात (Silver Price Today) 629 रुपयांची घसरण झाली आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावरही झाल्याने, सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 48,371 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव कमी होऊन 1830 डॉलर प्रति औंस इतका आहे. सोमवारी चांदीचा दर 62,469 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे.

  (वाचा - 1 जानेवारीपासून बदलणार Cheque पेमेंट करण्याचा नियम)

  मौल्यवान धातूच्या किंमतीत घसरण का? एचडीएफसी सिक्येरिटीजचे (HDFC Securities) सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशाने वधारला आहे. सोन्या-चांदीच्या आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती कमी झाल्याने, भारतीय बाजारातही त्याचा परिणाम झाला आहे. त्याशिवाय कोरोना व्हायरसबाबत (Corona Vaccine) येणाऱ्या सकारात्मक चर्चांमुळेही सोन्याच्या किंमतीवरील दबाव वाढतो आहे.

  (वाचा - कोरोनामुळे कर्जाचे हप्ते फेडण्यास समस्या? RBI अशी करेल मदत)

  कोरोना काळात शेयर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण असल्याने गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे होता. सुरक्षित गुंतवणूक म्हणून, अनेक गुंतवणूकदारांकडून सोन्याची मोठी खरेदी होत होती. त्यामुळे ऑगस्टमध्ये सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर पोहचला होता. मात्र आता कोरोना वॅक्सिनबाबतच्या सकारात्मक चर्चांमुळे सोन्यातील गुंतवणूक कमी झाली असून किंमती घसरल्या आहेत. मागील चार महिन्यात सोने दरात 7776 रुपयांची, तर चांदीचा भाव उच्चांकी स्तरावरून 15,412 रुपयांवर घसरला आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Gold, Gold and silver prices today, The gold

  पुढील बातम्या