मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत मोठा बदल तर चांदी झाली स्वस्त; वाचा आजचा लेटेस्ट भाव

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत मोठा बदल तर चांदी झाली स्वस्त; वाचा आजचा लेटेस्ट भाव

Gold Price Today: तुम्ही सोनेखरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण रेकॉर्ड स्तरापेक्षा सोन्याचे दर 8000 रुपयांनी स्वस्त आहेत.

Gold Price Today: तुम्ही सोनेखरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण रेकॉर्ड स्तरापेक्षा सोन्याचे दर 8000 रुपयांनी स्वस्त आहेत.

Gold Price Today: तुम्ही सोनेखरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण रेकॉर्ड स्तरापेक्षा सोन्याचे दर 8000 रुपयांनी स्वस्त आहेत.

नवी दिल्ली, 09 जुलै: भारतामध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Rates) गेल्या काही  दिवसांपासून घसरण होत होती, शुक्रवारी सोन्याच्या दरात (Gold Price Today) उसळी पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange MCX) वर सोन्याचे दर 9 जुलै रोजी 0.31 टक्क्यांनी वाढले आहेत, या तेजीनंतर दर  47,868 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. शुक्रवारी पुन्हा एकदा चांदीच्या दरात (Silver Rates) घसरण झाली आहे. सप्टेंबरच्या चांदीची (Silver Price Today) वायदे किंमत 0.27 टक्क्यांनी घसरली आहे. यानंतर चांदीचे दर 68,778 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर

आंतरराष्ट्रीय स्तरावर शुक्रवारी अमेरिकन ट्रेजरी यील्डमध्ये घसरण पाहायला मिळाली, त्यामुळे सोन्यात तेजी आली आहे. ज्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. स्पॉट गोल्डची किंमत 0.2 टक्क्यांनी वाढून 1,805.39 डॉलर प्रति औंस झाली आहे. रॉयटर्सच्या मते अमेरिकन सोन्याचे दर 0.4 टक्क्यांनी वाढून 1,806.50 डॉलर झाले आहेत.

हे वाचा-वडाखाली भरणारा शेअर बाजार ते इंटरनेट युग! Bombay Stock Exchangeला 146 वर्ष पूर्ण

रेकॉर्ड स्तरापेक्षा 8000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये एमसीएक्सवर सोन्याचे दर 56,191 रुपये प्रति तोळाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. आज सोन्याची ऑगस्टची वायदे किंमत 47,868 रुपये प्रति तोळा आहे. अर्थात अद्याप सोन्याचे दर सर्वोच्च स्तरापेक्षा 8000 रुपयांनी कमी आहेत.

हे वाचा-SBI च्या या खातेधारकांना 30 लाखांपर्यंत मिळेल लाभ, आहेत हे 5 बंपर फायदे

अशाप्रकारे घरबसल्या तपासा सोन्याचे दर

तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही  www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

First published:
top videos

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today