मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: सोनं 50 हजार पार; चांदीच्या दरातही मोठी वाढ, जाणून घ्या काय आहे आजचा भाव

Gold Price Today: सोनं 50 हजार पार; चांदीच्या दरातही मोठी वाढ, जाणून घ्या काय आहे आजचा भाव

भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत आज वाढ झाली आहे. सोन्या-चांदीच्या आंतरराष्ट्रीय किंमतीचा भारतीय बाजारावर परिणाम झाला आहे.

भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत आज वाढ झाली आहे. सोन्या-चांदीच्या आंतरराष्ट्रीय किंमतीचा भारतीय बाजारावर परिणाम झाला आहे.

भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत आज वाढ झाली आहे. सोन्या-चांदीच्या आंतरराष्ट्रीय किंमतीचा भारतीय बाजारावर परिणाम झाला आहे.

  • Published by:  Karishma Bhurke
नवी दिल्ली, 21 डिसेंबर : भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत आज वाढ झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात 21 डिसेंबर 2020 रोजी सोने दरात 496 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर 50000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे. चांदीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. आज 2000 रुपयांहून अधिक चांदीचा भाव वाढला आहे. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 49,801 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर चांदी 67,228 रुपये प्रति किलोग्रॅम होती. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कोरोना व्हायरसबाबत चिंतेचं वातावरण निर्माण झाल्याने, सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचे आजचे दर (Gold Price, 21 December 2020) - दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव 496 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला आहे. त्यामुळे दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवा भाव 50.297 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. त्याशिवाय रुपया डॉलरच्या तुलनेत 17 पैशांनी घसरला असून 73.73 वर पोहचला आहे.

(वाचा - Corona Impact: एप्रिल-नोव्हेंबर 2020 मध्ये सोन्याच्या आयातीत 40 टक्क्यांची घसरण)

चांदीचा नवा भाव (Silver Price, 21 December 2020) - सोमवारी चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात आज चांदीच्या दरात 2249 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा भाव 69,477 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे.

(वाचा - Post Officeच्या या स्किममध्ये गुंतवणूक केल्यास,दुप्पट मिळतील पैसे; काय आहे योजना)

एचडीएफसी सिक्योरिटीजचे (HDFC Securities) सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्या-चांदीच्या आंतरराष्ट्रीय किंमतीचा परिणाम भारतीय बाजारावर पडला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे (New Strain of Coronavirus) कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ झाल्याने, गुंतवणूकदारांमध्ये सुरक्षित गुंतवणूकीची चिंता वाढली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आज पुन्हा सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिलं आहे. दरम्यान, नव्या स्ट्रेनमुळे ब्रिटनमध्ये (Britain) पुन्हा एकदा कडक लॉकडाउन (Strict Lockdown) लागू करण्यात आलं आहे. यूरोप आणि दुसऱ्या काही भागात लावण्यात आलेल्या निर्बंधांचा प्रभाव जागतिक अर्थव्यवस्थेवर (Global Economy) होत असल्यास बोललं जात आहे.
First published:

Tags: Gold, Gold and silver prices today

पुढील बातम्या